एक्स्प्लोर

आत्मसमर्पित 13 नक्षलवादी युवक-युवतींचं शुभ मंगल सावधान; मुख्यमंत्र्यांकडून आशीर्वाद, पोलीस बनले वऱ्हाडी

गडचिरोली पोलीस दलातर्फे आत्मसमर्पित नक्षलवादी युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा लग्नसोहळा संपन्न होत आहे.

गडचिरोली : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि सुखाचा क्षण असतो. त्यामुळेच, मित्र-परिवार, नातेवाईक, सहकारी सर्वजणांच्या साक्षीने या आनंदाच्या सोहळ्याचे सेलिब्रेशन होत असते. गरिबापासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या जीवनात हा क्षण सदैव आठवणीत राहणारा असतो. मुलगा थोडा वाईट वागत असेल, किंवा जबाबदारीने वागत नसेल तर घरचे म्हणतात, याचं लग्न (Marriage) लावून द्या म्हणजे सुधारेल. मात्र, गडचिरोलीतील नक्षलवादी (Naxal) लग्नाआधीच चांगल्या मार्गावर आले असून त्यांनी आत्मसर्पण केलं आहे. या आत्मसमर्पण केलेल्या 13 नक्षल युवक-युवतींचा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात आणि पोलिसांच्या साक्षीने संपन्न होत आहे. विशेष म्हणजे गडचिरोली (Gadchiroli) पोलीस मुख्यालयात चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत येथे शुभ मंगल सावधान म्हणत अक्षता पडणार आहेत. 

गडचिरोली पोलीस दलातर्फे आत्मसमर्पित नक्षलवादी युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा लग्नसोहळा संपन्न होत आहे. जवळपास 13 आत्मसमर्पित नक्षल युवक युवती या विवाह सोहळ्यातून लग्न बंधनात अडकणार आहेत. तत्पूर्वी गडचिरोली पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे पोलीस मुख्यालय परिसरातून वर-वधुंची वाजत जागत वरात काढण्यात आली. या वरातीत पोलीस कर्मचारी वऱ्हाडी बनवून सहभागी झाले होते. विवाह बंधनात अडकणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नक्षली गिरीधरसह नक्षल युवक-युवतींनी या लग्न सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.  

वर्षानुवर्षे घनदाट जंगलात बंदुकीच्या जोरावर क्रांती घडवू पाहणाऱ्या अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाची वाट धरली आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनात विकासाची नवीन पहाट उजाडली आहे. गडचिरोली पोलिसांनी या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची रेशीमगाठ जुळवून आणली असून आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्म समर्पित नक्षलवाद्यांचा सामूहिक विवाह सोहळा गडचिरोलीच्या पोलीस मुख्यालयात पार पडत आहे. पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू अलाम सभागृहात हा विवाह सोहळा संपन्न होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह गणमान्य नागरिक उपस्थित राहणार आहेत. नव विवाहित नक्षल दांपत्यांना मुख्यमंत्री स्वतः शुभ आशीर्वाद देणार असून विविध साहित्याचे वाटपही करणार आहेत. 

हेही वाचा

राज-उद्धव एकत्र, ठाकरेंच्या बंधुच्या मनोमिलनावर अजित पवारांचं परखड भाष्य; पत्रकारांनाच लगावला टोला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो

व्हिडीओ

Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report
Ravi Bhavan Mla Guest House : मंत्र्यांचा थाट, 'गरीबखान्या'कडे पाठ; राजकीय खळबळ Special Report
Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Labour Code : नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
नव्या लेबर कोडमुळं टेक होम सॅलरी कमी होणार? श्रम मंत्रालयानं चर्चांवर उत्तर देत सगळं स्पष्ट केलं...
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget