एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Maharashtra CM: उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला जाणार?; महायुतीकडून निमंत्रण

Devendra Fadnavis Maharashtra CM: देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली असून देशभरातील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

Devendra Fadnavis Maharashtra CM मुंबई: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Maharashtra CM) आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5.30 वाजता  शपथविधी सोहळा होईल. तर आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असून तर बाकीचे मंत्री अधिवेशनाआधी शपथ घेतील, अशी माहिती भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

भाजपकडून शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. तिन्ही पक्षाचा उल्लेख असलेली निमंत्रण पत्रिका भगव्या रंगात, निमंत्रण पत्रिकेवर 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी' असा उल्लेख करण्यात आलं आहे. शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली असून देशभरातील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

महायुतीच्या आजच्या शपथविधी सोहळ्याला 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे यांना देखील निमंत्रीत केले जाणार आहे.तर केंद्र सरकारमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले यांच्यासह महत्वाचे केंद्रातील पाच मंत्री देखील या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. 

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनाही निमंत्रण-

राजशिष्टाचारनूसार देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. याप्रमाणे माजी मुख्यमंत्री असल्याने उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. तर महाराष्ट्रातील शरद पवार राज्यसभा सदस्य असल्याने त्यांनाही आजच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना देखील निमंत्रण दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

प्रत्येक जिल्ह्यातून 29 पदांवरील पदाधिकाऱ्यांना निमंत्रण

लोकसभा सदस्य 
राज्यसभा सदस्य 
बोर्ड, महामंडळ, आयोग अध्यक्ष 
माजी खासदार 
केंद्रीय पदाधिकारी 
प्रदेश पदाधिकारी 
विभाग संघटन मंत्री 
विधानसभा सदस्य 
विधान परिषद सदस्य 
प्रदेश कार्यकारणी सदस्य 
प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य 
निमंत्रित सदस्य 
लोकसभा कोअर कमिटी 
लोकसभा निवडणूक प्रमुख 
विधानसभा निवडणूक प्रमुख 
विधानसभा संयोजक 
जिल्हाध्यक्ष- महामंत्री 
मुंबई पदाधिकारी व मोर्चा पदाधिकारी 
देशमुख मोर्चा पदाधिकारी
प्रदेश प्रकोष्ट पदाधिकारी 
जिल्हा मोर्चा अध्यक्ष 
प्रदेश प्रवक्ते 
मंडल अध्यक्ष व महामंत्री 
मनपा, जि प, पं समिती, नगरपरिषद व नगरपंचायत सदस्य (2017 पासून पुढील) 
बाजार समिती सभापती व उपसभापती ( 2017 पासून पुढील)
जिल्हा बँक व सहकारी बँक संचालक/ भाजप पदाधिकारी 
सर्व प्रकोष्ट जिल्हा संयोजक
विधानसभा विस्तारक 
जिल्हा संवादक

संबंधित बातमी:

भगव्या रंगाच्या निमंत्रणपत्रिकेवर भाजप कार्यकर्त्यांना हवीहवीशी वाटणारी मोहोर उमटलीच, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारच!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Osho : ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Fact Check: मदरसा शिक्षकांच्या आंदोलनाचा व्हिडीओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा दावा करत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
पाटणा येथील मदरसा शिक्षकांचा व्हिडिओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा खोटा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM : 11 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सParbhani Rada : परभणीत महिला आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोडMaharashtra Superfast News :  11 December 2024  : सुपरफास्ट बातम्या : ABP MajhaRamdas Athawale : आरोपीवर कठोर कारवाई व्हावी - रामदास आठवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Osho : ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
ओशोंचा मृत्यू 34 वर्षांनंतरही गूढ का राहिला? कोणत्या दोन लोकांना सर्वाधिक फायदा झाला अन् पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप का केला नाही?
RAW Agent Ravindra Kaushik : रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
रिअल लाईफमध्येही ' एक था टायगर'! पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडलेल्या रॉ एजंटचं पुढे जाऊन काय झालं?
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
EVM बाबत रान पेटवणाऱ्यांना उज्ज्वल निकम यांचा सल्ला; मविआ नेत्यांवर जोरदार निशाणा
Fact Check: मदरसा शिक्षकांच्या आंदोलनाचा व्हिडीओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा दावा करत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर  
पाटणा येथील मदरसा शिक्षकांचा व्हिडिओ वक्फ बोर्डाच्या पाठिंब्यासाठी असल्याचा खोटा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Mukhyamantri Sahayata Nidhi: मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
मंगेश चिवटेंना हटवलं, रामेश्वर नाईक नवे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख
Parbhani Violance : मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
मोठी बातमी! परभणी बंदच्या हिंसक वळणावर जिल्हाधिकाऱ्यांचा 'या' निर्णयासह जमावबंदीचे आदेश!
Multibagger Stock: 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, ब्रोकरेज हाऊसनं आता कोणता अंदाज वर्तवला? 
54 रुपयांच्या स्टॉकनं दिला गुंतवणूकदारांना 12 पट परतावा, ब्रोकरेज हाऊसनं दिला लाखमोलाचा सल्ला
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
ह्रदयद्रावक घटना, सांगलीत भीषण अपघात; आईसह 2 मुलांचा मृत्यू, दुचाकीचा चेंदामेंदा
Embed widget