Flaming Torch Symbol : 'मशाल' ठाकरे गटाचीच, निवडणूक चिन्हाविरुद्धची समता पक्षाची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली
Flaming Torch Symbol : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे गटाच्या 'मशाल' चिन्हाविरोधातील समता पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
Flaming Torch Symbol : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाला दिल्ली उच्च न्यायालयाकडून (Delhi High Court) मोठा दिलासा मिळाला आहे. ठाकरे गटाच्या 'मशाल' चिन्हाविरोधातील समता पक्षाची (Samata Party) याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. म्हणजेच आता आगामी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं निवडणूक चिन्ह हे पेटती मशाल हेच राहणार आहे.
शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगात गेला. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि पक्ष चिन्ह गोठवलं. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाला 'मशाल' चिन्ह देत 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' असं नाव दिलं. तर एकनाथ शिंदे गटाला 'ढाल आणि तलावर' हे निवडणूक चिन्ह देत गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' नाव दिलं होतं.
परंतु उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या पेटती मशाल या निवडणूक चिन्हावर जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाने आक्षेप घेतला होता. सोबतच अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला मशाला चिन्ह देऊ नये आणि हे चिन्ह रद्द करावं अशी मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरुन ठाकरे गटासमोर नवा पेच उभा राहिला होता. परंतु हायकोर्टाने ही याचिका फेटाळून समता पक्षाला झटका दिला आहे.
VIDEO : Thackeray vs Samata Party : ठाकरे गटाच्या निवडणूक चिन्हाच्या विरोधातील याचिका दिल्ली कोर्टाने फेटाळली
याचिका फेटाळताना न्यायमूर्ती काय म्हणाले?
समता पक्षाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी म्हटलं की, "मशाल चिन्हावर आपला दावा सिद्ध करण्यास समता पक्षा अपयशी ठरला आहे. कोणताही अधिकार नसताना याचिकाकर्ते चिन्ह रद्द करण्यासाठी आदेश मागू शकत नाही." यासोबतच 2004 मध्येच समता पक्षाची मान्यता रद्द करण्यात आली होती हे सुनावणीदरम्यान समोर आलं. आणखी एक बाब म्हणजे समता पक्षाने 2014 मध्ये पेटती मशाल चिन्हाखाली निवडणूक लढवली होती, तर 2020 ची निवडणूक वेगळ्या चिन्हावर लढली होती. दरम्यान समता पक्षाची स्थापना 1994 मध्ये जॉर्ज फर्नांडिस आणि नितीश कुमार यांनी केली होती.
संबंधित बातमी