एक्स्प्लोर

ठाकरेंच्या 'मशाल'ची परीक्षा! 2004 साली राज्यातली मान्यता रद्द झालेला समता पक्ष मशालीसाठी आक्रमक; दिल्ली उच्च न्यायालयात धाव

Samata Party on Shivsena Symbol : अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंचं मशाल चिन्ह जाणार? समता पक्ष आज दिल्ली कोर्टात आपलं म्हणणं मांडणार

Samata Party on Shivsena Symbol : केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) शिवसेनेतल्या ठाकरे गटाला तात्पुरतं दिलेलं मशाल चिन्हही आता जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण समता पक्षानं ठाकरे गटाला अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत मशाल चिन्ह (Mashaal) मिळू नये यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. मशाल हे समता पक्षाचं (Samata Party) निवडणूक चिन्ह असल्याचा या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांचा दावा आहे. दरम्यान, या पक्षाची महाराष्ट्रातली (Maharashtra Politics) मान्यता 2004 सालीच रद्द झाली आहे. 

2004 साली राज्यातली मान्यता रद्द झालेला समता पक्ष शिवसेनेच्या मशाल चिन्हाविरोधात आज दिल्ली हायकोर्टाचे दरवाजे ठोठावणार आहे. मशाल चिन्ह अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंना देऊ नये, अशी समता पक्षाची मागणी आहे. त्यामुळे आता समता पक्षाच्या मागणी दिल्ली हायकोर्ट मान्य करणार की, नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

अंधेरीतील पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election 2022) ठाकरेंची शिवसेना मशाल चिन्हावर लढणार आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीचं बिगुल वाजलं असून आता प्रचाराला सुरुवातही झाली आहे. पण, ठाकरेंसमोर आता नवं विघ्न येऊन उभं राहिलं आहे. ठाकरेंना निवडणूक आयोगाकडून जे चिन्ह देण्यात आलं आहे. त्या चिन्हावर समता पक्षानं दावा केला आहे. समता पक्षानं आता थेट चिन्हालाच आव्हान दिल्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंच्या अडचणी वाढणार आहेत.

समता पक्षानं मशाला चिन्हाला दिल्ली हायकोर्टात आव्हान देण्याचं ठरवलं आहे. समता पक्ष यावर आज (शनिवार) कोर्टात याचिका दाखल करणार आहे. 2004 मध्ये समता पक्षाची राज्यातली मान्यता काढण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगानं ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल चिन्हं दिलं आहे. या चिन्हावर ठाकरेंची शिवसेना प्रथमच निवडणूक लढवत असताना समता पक्षानं याच चिन्हावर दावा केल्यानं कोर्टात काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.

ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर समता पार्टीचा दावा

ठाकरे गटाच्या नव्या पक्षचिन्ह मशालीवर समता पक्षानं दावा केला आहे. 1996 पासून मशाल हे आमचं चिन्ह असल्याचा दावा दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षानं केला आहे. तसंच पक्षानं निवडणूक आयोगातही लेखी तक्रार केली आहे. आता याप्रकरणी समता पक्ष दिल्ली हायकोर्टात दाद मागणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

बिहारमध्ये आम्ही कुठल्या चिन्हावर निवडणुका लढवल्या? 'मशाली'वरुन समता पार्टीचा निवडणूक आयोगासह ठाकरे गटाला सवाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका
Parbhani Zilla Parishad : परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget