एक्स्प्लोर

गुलाबी स्टेज, गुलाबी बॅनर्स, 'पिंक पॉलिटिक्स'वर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या गुलाबी रंगाच्या जॅकेटवर प्रतिक्रिया दिली. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं.

पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) खास कामगिरी करता आली नाही. त्याच्या पक्षाने चार जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी फक्त एका जागेवर त्यांच्या पक्षाचा उमेदवार विजयी झाला. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी चालू केली आहे. त्यासाठी त्यांच्या पक्षाकडून रणनीती आखली जात आहे. विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अजित पवार यांच्या सभेचा मंच, त्यांचे जॅकेट यासाठी गुलाबी रंगाचा वापर केला जात आहे. यावरच आता खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गुलाबी रंग

महाराष्ट्र सरकारने नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली आहे. या योजनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. याच योजनेच्या जोरावर महिला मतदार आमच्याकडे आकर्षित होतील, अशी सत्ताधारी महाविकास आघाडाली आशा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आपापल्या सभेत महिलांविषयीच्या योजनांचा जास्तीत जास्त उल्लेख करताना दिसतायत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तर महिल मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास रणनीती आखली आहे. अजित पवार यांच्या सभेत बॅनर्स, पोस्टर्स, मंच उभारणी यासाठी जास्तीत जास्त गुलाबी रंगाचा वापर केला जात आहे. विशेष म्हणजे अजित पवार हेदेखील गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये दिसले. याबाबतच पत्रकारांनी अजित पवार यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांनी त्यांच्या जॅकेटवर प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

येथे प्रत्येकानेच वेगवेगळे शर्ट घातलेले आहेत. मला कोणते कपडे परिधान करायचे? हा माझा अधिकार नाही का? मी माझे कपडे माझ्या पैशाने घालतो. तुमच्या कोणच्या पैशाने मी माझे कपडे घेतो का? जे कपडे सामान्य माणूस घालतो, तेच कपडे मी परिधान करतो. मी काहीतरी वेगळं केलेलं नाही. माझ्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं. अजित पवार तिसरी आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नात आहे, अशी चर्चा होती. यावर बोलताना या चर्चेमध्ये काहीही तथ्य नाही. अशा गोष्टी मी एका कानाने ऐकतो आि एका कानाने सोडून देतो, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा :

राज्यात काहीही घडू शकतं, कदाचित शरद पवार-अजित पवार एकत्र येतील; अतुल बेनकेचं खळबळजनक वक्तव्य

Atul Benke: महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, अमोल कोल्हेंच्या घरी अतुल बेनके-शरद पवारांची भेट, अजितदादा गटाला धक्का बसणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
Sharad Kelkar Movie Raanti :  अभिनेता शरद केळकर होणार 'रानटी', धडकी भरवणारा चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिलात का?
अभिनेता शरद केळकर होणार 'रानटी', धडकी भरवणारा चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिलात का?
Mammootty Birthday: साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
Congress On Adani Group: गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2PM :  16 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्सGopichand Padalkar On Sharad Pawar : शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सरManoj Jarange : सरकारने आरक्षण दिलं नाही तर फडणवीस जबाबदार, जरांगेंचा सरकारला इशाराChandrashekhar Bawankule : संजय गायकवाडांच्या वक्तव्याचं समर्थन नाही : चंद्रशेखर बावनकुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
अभिनेत्रीला खोट्या गुन्ह्यात अटक, 42 दिवस शारीरिक आणि मानसिक छळ; तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
Sharad Kelkar Movie Raanti :  अभिनेता शरद केळकर होणार 'रानटी', धडकी भरवणारा चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिलात का?
अभिनेता शरद केळकर होणार 'रानटी', धडकी भरवणारा चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहिलात का?
Mammootty Birthday: साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
साऊथ सुपरस्टार 'ममुटी', 100 कोटींच्या अलिशान कार; अभिनेत्याची एकूण संपत्ती किती
Congress On Adani Group: गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
गौतम अदानींना राज्य सरकारकडून 6 हजार 600 मेगावॅट वीज खरेदीचं टेंडर; 25 वर्षांसाठी करारबद्ध
Sujay Vikhe Patil : 'मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल', सुजय विखेंनी पुन्हा व्यक्त केली इच्छा, बाळासाहेब थोरातांना आव्हान?
'मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल', सुजय विखेंनी पुन्हा व्यक्त केली इच्छा, बाळासाहेब थोरातांना आव्हान?
Amin Patel Meets Fadnavis: मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईतील काँग्रेसचा बडा नेता फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
OTT Release This Week : 'या' आठवड्यात ओटीटी मनोरंजनाचा धमाका; रिलीज होणार 7 चित्रपट-वेब सीरिज, कपिलचे कमबॅक
'या' आठवड्यात ओटीटी मनोरंजनाचा धमाका; रिलीज होणार 7 चित्रपट-वेब सीरिज, कपिलचे कमबॅक
Embed widget