एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

राज्यात काहीही घडू शकतं, कदाचित शरद पवार-अजित पवार एकत्र येतील; अतुल बेनकेचं खळबळजनक वक्तव्य

अजित पवार यांचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली, या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. वेगवेगळ्या मतदारसंघांत आपली ताकत किती, याची जोजवणी या राजकीय पक्षांकडून केली जात आहे. त्यासाठी राज्यातील बडे नेते महाराष्ट्रभर फिरत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील काही नेते, विद्यमान आमदार विजयाचे गणित बघून सोईच्या पक्षात जाण्याची चाचपणी करत आहेत. असे असतानाच सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले अतुल बेनके यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल आहे. याच भेटीवर बेनके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 

शरद पवार आमच्यासाठी दैवत 

अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट गेतल्यानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत बेनके अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार का? असे विचारले जात आहे. या चर्चा चालू असतानाच बेनके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असं मला वाटतं. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्यासाठी दैवत आहेत. गेल्या 40 वर्षांचा बेनके परिवाराचा राजकीय इतिहास हा शरदचंद्र पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील यांच्या आशीर्वादाने चालू राहिलेला आहे. सध्या राजकीय स्थित्यंतरं झाली. सहा महिन्यांच्या तटस्थतेच्या भूमिकेनंतर आता जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अजित पवार यांच्यासोबत राहणं पसंत करेन," असं बेनके म्हणाले. 

त्यांचे स्वागत करणे ही माझी जबाबदारी

"मी लोकसभा निवडणुकीत घडाळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे आढळराव पाटील यांचा प्रचार केला म्हणून वेगळे प्रश्न उपस्थित करण्याची गरज नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून शरद पवार यांचे स्वागत करणे ही माझी जबाबदारी आहे. पण त्यांच्या स्वागतापलीकडे दुसरं काहीही नव्हतं," असं बेनके यांनी स्पष्ट केलं. 

कदाचित शरद पवार-अजित पवार एकत्र येऊ शकतील

"पक्षप्रवेशाबाबत मला शरद पवार काहीही बोलले नाहीत. मीही त्यांना काहीही बोललो नाही. म्हणूनच पक्षांतराचा प्रश्नच नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरं घडली. भविष्यात काहीही होऊ शकतं. कदाचित शरद पवार, अजित पवार एकत्रही येऊ शकतील. भविष्यातील राजकारणाबाबत सध्यातरी काहीही सांगता येत नाही. मी घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्षासोबत आहे. पण भविष्यात स्थित्यंतरं घडली तर मी काही सांगू शकत नाही," असेही अतुल बेनके म्हणाले.

हेही वाचा :

Atul Benke: महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, अमोल कोल्हेंच्या घरी अतुल बेनके-शरद पवारांची भेट, अजितदादा गटाला धक्का बसणार?

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget