एक्स्प्लोर

Congress leader : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी अन् 2 मुलांसमवेत विष खाल्लं, उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू

Congress leader : छत्तीसगढमधील चांपा जिल्ह्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने कुटुंबियांसमवेत विष खाल्लं आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने (Congress leader) पत्नी अन् 2 मुलांसमवेत विष खाल्लं आहे.

Congress leader : छत्तीसगढमधील चांपा जिल्ह्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने कुटुंबियांसमवेत विष खाल्लं आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने (Congress leader) पत्नी अन् 2 मुलांसमवेत विष खाल्लं आहे. दरम्यान, विष खाल्लेल्या चौघांना उपचारासाठी बिलासपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, चौघांचाही मृत्यू झाला आहे. संपूर्ण कुटुंबाने जीवन का संपवले? हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांकडून घर सील करण्यात आले असून चौकशी सुरु करण्यात आली आहे. 

31 ऑगस्ट रोजी इतर तिघांचाही मृत्यू झालाय 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंचराम यादव (वय 65, रा. कोतवाली, जांजगीर क्षेत्र वार्ड क्रमांक 10) यांनी त्यांच्या पत्नी आणि 2 मुलांसमवेत विष खाल्लं आहे. एसपी राजेंद्र जयस्वाल म्हणाले, पंचराम यादव यांनी त्यांची पत्नी नांदणी यादव (वय 55), मुलगा सूरज यादव (वय 27) आणि निरज यादव (वय 32) यांच्यासमवेत विष प्राशन केले. त्यानंतर चौघांनाही जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांना बिलासपूर येथे हलवण्यात आले होते. सिम्स रुग्णालयात निरज यादव याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इतर तिघांना हलवण्यात आले होते. दरम्यान 31 ऑगस्ट रोजी इतर तिघांचाही मृत्यू झालाय. 

काँग्रेस नेत्याने काढलं होतं 40 लाखांचं कर्ज 

अधिकच्या माहितीनुसार, पंचराम यादव काँट्रॅक्टरचे काम करत होते. त्यांनी दोन बँकांकडून 40 लाखांचे लोन घेतले होते. शिवाय त्यांना ह्रदयाशी निगडीत आजारही होता. शिवाय पंचराम यादव यांच्या पत्नी कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांचा मुलगा निरज यादव खासगी कंपनीत नोकरी करत होता. तर दुसरा मुलगा वडिलांप्रमाणे काँट्रॅक्ट घेत होता. 

घरातील दोन्ही बाजूंचे गेट बंद करुन जीवन संपवले

स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, आपण टोकाचं पाऊल उचलत आहोत, याबाबत कोणाला माहिती मिळू नये यासाठी नेत्यासह कुटुंबियांनी घरा बाजूचे दोन्ही गेट बंद केले होते. दोन्ही बाजूंनी कुलुप लावले आणि तिसऱ्या ठिकाणी आतून कुलुप लावत त्यांनी आत्महत्या केली आहे. एक मुलगी त्यांच्या घरी गेली, तेव्हा याबाबतचा खुलासा झाला. सातत्याने आवाज देऊनही कोणीही दरवाजी उघडत नव्हते. त्यामुळे तिला संशय आला आणि तिने आजूबाजूच्या इतर लोकांना याबाबतची माहिती दिली.  

इतर महत्वाच्या बातम्या 

Philadelphia Schuylkill River Video : कारमध्ये रोमान्स सुरु असतानाच गिअरला लागला धक्का अन् कार थेट नदीत; दोघांना विवस्त्रावस्थेत पळून जाण्याची आली वेळ

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
Rajya Sabha Election 2026: लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?

व्हिडीओ

CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?
Iran Vs America Special Report : इराणचा पलटवार, पश्चिम आशियात हाहाकार, कतारमधील तळ इराणचं लक्ष्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
Embed widget