'महायुतीमध्ये कोणताही संघर्ष नाही, जागावाटपाचं काम सुरु', मुक्तीसंग्रामाच्या ध्वजारोहणानंतर CM एकनाथ शिंदे म्हणाले, 'एवढे निर्णय कधी घेतले नव्हते..'
योजनामध्ये खोडा घालणाऱ्याना माझे लाडके भाऊ आणि बहीण नक्की जोडा दाखवतील.. केंद्र आणि राज्य मिळून आपण राज्याचा विकास करत आहे.
ChhatrapatiSambhajinagar: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय ध्वाजारोहण पार पडले. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार मागे पडणार नाही. मराठवाड्यात गेल्या दोन वर्षात विकासाचे अनेक प्रकल्प, उद्योग आणल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आगामी विधानरसभा निवडणूकीच्या जागाावाटपावर काम सुरु असून सममन्वयातून बोलणी सुरु आहे. जे काम आम्ही केले आहे त्याच्या पोचपावतीवर आणि अडीच वर्षात विरोधकांनी केलेलं कामआणि दोन वर्षातील महायुतीचे काम याची तुलना करून जागा ठरवल्या जातील. एवढे निर्णय कधीही घेतले नव्हते असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी मराठा आरक्षणावर मराठा समाजानं सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे असंही ते म्हणालेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते बोलत आहे.
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकार मागे पडणार नाही
मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी सरकार मागे पडणार नाही. आम्ही मराठवाडा विकासासाठी निर्णय घेतले आहेत असं ते म्हणाले. आज आम्ही मराठवाडा विकासासाठी निर्णय घेतले समृद्धी महामार्ग तयार झाला अनेक उदयोग आणले आहेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मराठवाड्यात होत आहे. लाडकी बहीण योजना केली आपल्या बहिणीला फायदा होईल. शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ केले आहे शेतकऱ्यांना 16 हजार कोटी रुपये मदत केली . मराठवाड्यातील साखर कारखाने सोबत imo साईन आपण करत आहे. मुलींच्या शिक्षणासाठी निर्णय घेतले लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आहे. अडीच कोटीचे आमचे टार्गेट आहे लाडकी बहणी पासून लाडक्या भावा, लाडक्या शेतकरी योजना आणली आहे पंतप्रधान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, 10 वर्षात त्यांनी देशाचे नाव जगभरात उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले. केंद्र आणि राज्य मिळून आपण राज्याचा विकास करत आहे कापूस आणि सोयाबीन बाबत आपण निर्णय घेतला आहे. यावर्षी चांगला पाऊस पडला, सर्वत समृद्धी अली आहे.
मराठा समाजानं सहकार्याची भूमिका घ्यावी
राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजानं सहकार्याची भूमिका घ्यावी असं आवाहन केले आहे. ते म्हणाले, संगे सोयरे बाबत काम सुरू आहे, आम्ही जे बोलतो ते करतो, आमची डबल भूमिका नाही.. दुटप्पी भूमिका सरकारने कधीच घेतली नाही, शिंदे समिती नेमली आणि कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे..एक मोठं यश आहे. ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं म्हटले होते, यासाठी विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण आम्ही दिले... त्याविरुद्ध कोर्टात कोण गेले हे तुम्हाला माहित आहे. त्यामुळे सगे सोयरे, गॅझेटचा विषय आहे, यासाठी शिंदे समिती आणि शिंदे समिती काम करत आहे. कुणाची आम्ही दिशाभूल करणार नाही आणि फसवणूक करणार नाही, दिलेला शब्द आम्ही पाळणार, जे देऊ कायद्याच्या चौकटीत बसणारे आहे. मी मुख्यमंत्री झाल्यापासून 5 हजार मराठा तरुणांना आम्ही नोकरी दिली. सारथी व्ययप्ती वाढवली. 1 लाख लोकांना बिन व्याजी कर्ज दिले. माझं आवाहन आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर, सहकार्यची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील सहकार्यची भूमिका घेतली पाहिजे"
एवढे निर्णय कधीही घेतले नव्हते.
'महायुतीमध्ये कोणताही संघर्ष नाही, समन्वयाने आम्ही निर्णय घेत आहे, काळजी करू नका, योजनामध्ये खोडा घालणाऱ्याना माझे लाडके भाऊ आणि बहीण नक्की जोडा दाखवतील.. योजना बंद व्हावी म्हणून तुम्ही कोर्टात जातात... महिलांना लाच देतात.बदनाम करण्याचा प्रयत्न करतात,थोडी जनाची नाही तर मनाची राखली पाहिजे, जागावाटप काम सुरू आहे, बोलणं सुरू आहे, समनव्यातुन बोलणी सुरू आहे काळजी करू नका,, जे काम आम्ही केले आहे त्याच्या पोचपावतीवर आणि अडीच वर्षात विरोधकांनी केलेलं कामआणि दोन वर्षातील महायुतीचे काम याची तुलना करून एवढी निर्णय कधीही घेतली नव्हते, जनता याचा निर्णय घेणार आणि महायुती पुन्हा येईल.' असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.