(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde : खोटं बोल पण रेटून बोल, ही त्यांची संस्कृती; उद्धव ठाकरेंच्या दाव्याबद्दल मुख्यमंत्री स्पष्टच बोलले!
CM Eknath Shinde: उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत भरपूर मुलाखती दिल्या आहेत. मात्र खोट बोल पण रेटून बोल, ही उद्धव ठाकरे यांची संस्कृती असल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
CM Eknath Shinde वाशिम : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आतापर्यंत भरपूर मुलाखती दिल्या आहेत. बंद दाराआड काय झालं, उघडपणे काय झालं, हे सारं त्यांनी सांगितलंय. मात्र हे सगळं खोट असून खोटं बोलण्याची पण एक परीसीमा असते. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. शिवसेना(Shiv Sena) भाजपच्या (BJP) गटबंधनांमध्ये त्यांना मुख्यमंत्री होता आलं नसतं. म्हणून त्यांनी असे सांगितलं की अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत आमची चर्चा झाली. मात्र अमित शाहानी या बाबत स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे अशा गोष्टींना आता फार अर्थ उरत नाही. खोट बोल पण रेटून बोल ही उद्धव ठाकरे यांची संस्कृती असल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान त्यांनी माजी मंत्री सुभाष ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत त्यांनी केलेला दावा फेटाळून लावलाय.
पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवारांचा हात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पहाटेच्या शपथविधी प्रकरणी खुलासा करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अजित पवार यांनी यापूर्वी देखील खुलासा केला आहे. त्यामुळे त्यांना हे कृत्य करण्यास कोणी भाग पाडलं, त्यांच्या मागे कुणाचा हात होता, ही वस्तुस्थिती लोकांनां माहिती आहे. आता अजितदादा पवार महायुतीचा एक भाग म्हणून आज आमच्या सोबत आहे. महायुतीमध्ये राज्यात मोठे विकासकामे होत आहे. त्यामुळेच अजित पवार आमच्यात शामिल झाले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
फेसबुक लाईव्हवर नाही तर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाणारे सरकार
दोन वर्षांत राज्याचा सर्वांगीण विकास झाला असून सर्व घटकांना सोबत घेऊन आम्ही काम करतो आहे. त्यासाठी केंद्राची मदत देखील आम्हाला मिळत आहे. पंतप्रधान मोदींनी गेल्या दहा वर्षात केलेली विकासकामे ही काँग्रेसला गेल्या पन्नास-साठ वर्षात करता आली नाही आणि पुढे शंभर वर्षांतही करता येणार नाह, असे क्रांतिकारी काम पंतप्रधानांनी केले आहे. त्यातच राज्याने घेतलेले निर्णय, राज्यात केलेले काम, लोकांसाठी सुरू केलेल्या असंख्य योजना, असा सर्वांगीण विकास आम्ही केला आहे. आज हाच मुद्दा पुढे घेऊन आम्ही मतदारांपर्यंत जातो आहे. शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख कार्यक्रम घेऊन आम्ही लोकांपर्यंत जातो आहे. हे सरकार फेसबुक लाईव्ह वरचं सरकार नसून सर्वसामान्यांच्या दारापर्यंत, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाणारे सरकार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या