एक्स्प्लोर

माझ्यासोबत तुम्ही काय काय केलं, झाकली मूठ आहे, अन्यथा पवार साहेबांना त्रास होईल, चित्रा वाघ यांचा विद्या चव्हाण यांना इशारा

Vidya Chavan Vs Chitra Wagh : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर सनसनाटी आरोप केला. यानंतर चित्रा वाघ यांनी विद्या वाघ यांना इशारा दिलाय.

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर गंभीर आरोप केले. घरगुती वादात सुनेला फूस लावल्याचा आरोप करत विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांची एक ऑडिओ क्लिप दाखवली. यावरून आता चित्रा वाघ यांनी माझ्यासोबत तुम्ही काय काय केलंय, झाकलेली मूठ आहे. उघडायला लावू नका नाहीतर पवार साहेबांना (Sharad Pawar) त्रास होईल, असा इशाराच विद्या चव्हाण यांना दिला आहे. 
 
विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांची सून आणि चित्रा वाघ यांच्यातील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिपही ऐकवली. यावेळी विद्या चव्हाण म्हणाल्या की, माझ्या घरामध्ये पाच वर्षांपूर्वी जे झाले होते. त्यामध्ये माझ्या सुनेला चित्रा वाघ यांनी माझ्याविरोधात भडकावले. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ही कामगिरी आपल्यावर सोपावली असल्याचे  चित्रा वाघ या ऑडिओत म्हणत आहेत. चित्रा वाघ वारंवार म्हणत असतात की आम्ही कुणाच्या मध्ये बोलत नाही. पण या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून स्पष्ट होतंय की चित्रा वाघ यांनीच आमच्या घरात भांडण लावण्याचं काम केले, असा गंभीर आरोप विद्या चव्हाण यांनी चित्र वाघ यांच्यावर केला. 

विविध महिलांच्या माध्यमातून माझ्यावर आरोप

यावरून चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांना इशारा दिलाय. चित्रा वाघ यांनी म्हटलंय की, माझावर अतिशय प्रेम करणाऱ्या विद्या चव्हाण यांची प्रेस ऐकली. कालपासून त्या माझाबद्दल सनसनाटी बोलणार, असं म्हणत होत्या. माझाबद्दल त्या चांगल्या कधीही बोलल्या नाहीत. या आधी मी कशी वाईट आहे. विविध महिलांच्या माध्यमातून माझ्यावर त्यांनी आरोप केले. ते बोलणं माझं नाही, देवेंद्रजींचं नाही. ते सरकारी वकिल प्रवीण चव्हाण यांचं वक्तव्य आहे. 

अन्यथा पवार साहेबांना त्रास होईल

हा संवाद विधानसभेच्या पटलावर देवेंद्रजींनी मांडला होता. त्या म्हणतात चित्रा वाघला मी मोठं केलं. मला पक्षाने संधी दिली, मी काम केलं. 20 वर्षात पायाचं कातडं काढून पक्षाला दिलेत. जी जबाबदारी दिली ती मी पार पाडली आहे. चित्रा वाघमध्ये काही तरी क्वालिटी होती म्हणून पक्षाने जबाबदारी दिली. आम्ही कधीही लाभाची पर्वा केली नाही. राष्ट्रवादीने मला कुठलं लाभाचं पद दिलं. माझी मूठ झाकलेली आहे. ती उघडायला लावू नका, नाही तर पवारसाहेब यांना त्रास होईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. आमच्या पक्षातील नेत्यांना बोलतांना आपलं भाण कुठे जातं. पेरणार तेच उगवणार आहे. पेन ड्राइव्हची वाट आम्ही अनिल देशमुखांची बघत होतो. जे पुरावे आहेत ते सादर करा, अन्यथा ३ तासात आम्ही पेन ड्राईव्ह सादर करू, असा इशाराही चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांना दिला आहे.   

आणखी वाचा

विद्या चव्हाणांच्या धाकट्या मुलाने वहिनीवर हात टाकला, विनयभंग केला, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 19 नोव्हेंबर  2024: ABP MajhaBaramati : Shrinivas Pawar यांच्या शरयू मोटर शोरुमध्ये सर्च ऑपरेशन,तपासणीत काही न आढळल्याची माहितीCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 19 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaVidhansabha Election 2024 :  मालिकांमधून छुप्या पद्धतीने प्रचाराचा शिंदे गटावर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandgad Vidhan Sabha : तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
तीन बंडखोर अन् कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 17 उमेदवार रिंगणात! चंदगडच्या बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
Shrinivas Pawar : बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
बारामतीत शेवटच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा! युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरूमवर छापा, श्रीनिवास पवार म्हणाले...
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; म्हणाले, आज रात्रीपर्यंत....
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
पॅरिसला चाललेलं आंतरराष्ट्रीय विमान पायलटने जयपूरमध्येच सोडून दिले अन् विमानातील 180 पॅसेंजर...! विमान सोडताना कारणही दिलं भन्नाट
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray: तुमच्या घरात सुनेला जाच होतो वाटतं; उद्धव ठाकरेंना खाष्ट सासू म्हणणाऱ्या राज ठाकरेंना किशोरी पेडणेकरांनी सुनावलं
अमितच्या बायकोशी शर्मिला ठाकरे खाष्ट सासूप्रमाणे वागतात का? किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंवर बोचरा वार
Vinod Tawde: विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
विनोद तावडे 5 कोटी घेऊन आले, दोन डायऱ्याही सापडल्याचा आरोप; विरारमध्ये बविआ-भाजपचा राडा
Anil Deshmukh Attack: 10 किलोचा दगड 20 फुटांवरुन कसा पडला? अनिल देशमुखांच्या गाडीचा स्पीडही कमी; भाजपच्या नेत्याला वेगळाच संशय
अनिल देशमुखांचा 'तो' बॉडीगार्ड, 10 किलोंचा दगड; भाजप नेत्याला हल्ल्याबाबत वेगळाच संशय
Trending : मिटिंगला आले नाही म्हणून बॉसने करिअरवर वरवंटा फिरवला, एका फटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
ऑफिस मिटिंग जॉईन केली नाही म्हणून बॉसचं डोकं फिरलं, एका झटक्यात 99 जणांना नोकरीवरुन काढलं
Embed widget