एक्स्प्लोर

विद्या चव्हाणांच्या धाकट्या मुलाने वहिनीवर हात टाकला, विनयभंग केला, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

Chitra Wagh BJP vs Vidya Chavan : विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांची ऑडिओ क्लिप ऐकवली होती. त्यानंतर लगेचच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्या चव्हाण यांच्यावर तुफान हल्ला चढवला. 

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माजी आमदार विद्या चव्हाण यांच्या धाकट्या मुलाने थोरल्या सुनेवर हात टाकला, तिचा विनयभंग केला, असा सनसनाटी आरोप चित्रा वाघ यांनी केला. विद्या चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांनी त्यांच्या घरगुती वादात सुनेला फूस लावल्याचा आरोप केला होता. विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांची ऑडिओ क्लिप ऐकवली होती. त्यानंतर लगेचच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्या चव्हाण यांच्यावर तुफान हल्ला चढवला. 

चित्रा वाघ नेमकं काय म्हणाल्या? 

एक डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी गेली होती तिथे विद्या चव्हाण यांची सून होती. विद्या चव्हाण यांना पहिला नातू अर्थात सूनेला मुलगा व्हावा अशी इच्छा होती. दुसरी मुलगी प्री मॅच्युअर होती यावरून त्रास दिला जात होता. त्यांच्या सूनेने मला कशी छळ करते हे सांगितलं. त्यांच्या धाकट्या मुलाने आपल्या वहिनीवर हात टाकला विनयभंग केला. सूनेने सासू विद्या चव्हाणकडे तक्रार केली. पण घरातल्या गोष्टी बाहेर नकोत हे सांगणाऱ्या विद्या चव्हाण होत्या. त्यावेळी त्या राष्ट्रवादीच्या आमदार होत्या. गुन्हा दाखल करतेवेळी पोलिस ठाण्यात येऊन धमकावत होत्या. 

विद्या चव्हाण यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये. तीच पीडित महिला पवारसाहेब, जयंत पाटील यांच्याकडे गेली, मात्र कुठलाही रिस्पॉन्स मिळाला नाही.  ती मुलगी डॉक्टर आहे. 

त्या पोरीला केलं मी गाईड, काय करणार आहेत विद्या चव्हाण? त्यांच्यातल्या कला मला माहित आहेत. हा जर अपराध असेल तर असे अपराध मी करत राहीन. 

लोकांसमोर जाण्याची त्या पीडित मुलीला मी सांगितलं. आज त्यामुळेत तिचे बाळ तिच्यासोबत आहे. बाईची व्यथा समजते, आई लेकरांची हाय हिला (विद्या चव्हाण) लागली आहे.  सगळ्या केसेस ही विद्या चव्हाण हरली आहे. 

एखाद्या बाईवर अन्याय होत असेल तर मी सहकार्य करणार. त्या पेन ड्राइव्हची पुंगळी कर आणि कुठे ठेवायचे ते ठेव. असे हजार अपराध करायला मी तयार आहे. जे केलं त्याचा मला अभिमान आहे. 

विषय राजकीय करायचा होता. म्हणून हे चव्हाण यांनी केलं. पवारसाहेब व सुप्रिया ताईंनी या गँगला आवरायला हवं. माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही.

२० वर्ष तुमच्या पक्षात होते. पण बापासारखं प्रेम केलं. माझ्या परिवाराला अडचणीत आणलं, माझी नावं १०० लोकांसोबत जोडली. सुप्रिया सुळेंनी अनेक महिलांना माझ्याविरुद्ध प्रेस कॉन्फरन्स घेऊन नको नको ते आरोप केले. आता परत हिला पाठवलं. तुमच्याकडे गौरी चव्हाण आली असती तर मदत केली असती का नाही?  आम्ही अजूनही वाट बघतोय, ३ तासात देशमुखांनी पेनड्राईव्ह  आणावा अन्यथा कोण कोण काय काय बोललं ते सांगू, असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.  

Chitra Wagh PC VIDEO :  चित्रा वाघ यांचा विद्या चव्हाण यांच्यावर हल्लाबोल

संबंधित बातम्या 

''चित्रा वाघ यांनी सापशिड्यांसारखं अनेकांना वापरलंय''; महिला नेत्यांमध्ये जुंपली, विद्या चव्हाण यांचा पलटवार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahajibapu Patil on Ekanath Shinde : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, शहाजीबापूंचं वक्तव्यABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP MajhaNair Hospital Case : डीनची बदली, विरोधकांची टीका; सुळे, पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Embed widget