एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal and Sharad Pawar : पुण्यातील कार्यक्रमाला छगन भुजबळ उशीरा आले, शरद पवारांना दीड तास ताटकळत बसावं लागलं

Chhagan Bhujbal and Sharad Pawar, Pune : पुण्यातील चाकण बाजार समिती परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

Chhagan Bhujbal and Sharad Pawar, Pune : पुण्यातील (Pune) चाकण बाजार समितीमध्ये आज (दि.3) सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) उपस्थित होते. यावेळी शरद पवारांनी  (Sharad Pawar)  छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) पत्रिकेवर एक लिखित संदेश दिला, त्यानंतर दोघांमध्ये काही सेकंदाचा संवाद ही झाला अन् दोघे एकमेकांकडे हसू ही लागले. हे सगळं घडलं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण सोहळ्यात पाहायला मिळालं. 

सावित्रीबाई फुलेंच्या पुतळा अनावरण सोहळ्यात पवार -भुजबळ एकत्र 

दरम्यान, चाकण बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोघेही 5 वाजून 45 मिनिटांनी पोहचले. सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण पवारांच्या हस्ते पार पडणार होतं. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री छगन  भुजबळ होते. त्यामुळं मंचावर दोघे एकमेकांच्या बाजूला बसले होते. 

छगन भुजबळ तब्बल दीड तास उशिरा आले, शरद पवारांना दीड तास ताटकळत बसावं लागलं

मात्र मंचावर आल्यापासून दोघांनी एकमेकांकडे पाहणं ही टाळलं होतं. मुळातच शरद पवार हे या कार्यक्रमासाठी चार वाजताच पोहचले होते. मात्र,भुजबळ तब्बल दीड तास उशिरा आल्यानं पवारांना दीड तास ताटकळत बसावं लागल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं वेळेला महत्व देणाऱ्या पवारांना साहजिकच थोडा का होईना राग आला असेल याची कल्पना छगन भुजबळांना होतीच. त्यामुळं मंचावर आल्यापासून भुजबळांनी ही बोलणं टाळलं. मात्र त्याचवेळी पवारांनी पत्रिकेवर दोन ओळी मजकूर लिहिला. मग भुजबळांच्या हातातील पत्रिका काढून घेतली अन् स्वतःच्या हातातील पत्रिका त्यांच्या हातात सोपवली. मग पवारांनी भुजबळांना खुणावले अन वीस मिनिटांनी दोघांमध्ये काही सेकंद संवाद झाला. त्यानंतर दोघे एकमेकांकडे पाहून हसले ही. मंचावरील या घडामोडींमुळं राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेल्या आहेत.

छगन भुजबळ काय काय म्हणाले?

छगन भुजबळ म्हणाले, मागे मी पवार साहेबांशी चर्चा केली. अनेक जण म्हणतात फुलेंना भारतरत्न दिले पाहिजे. मी साहेबांना विचारलं महात्मा मोठं की भारतरत्न मोठं? मुळात भारतरत्न किती अन महात्मा किती आहेत? अहो महात्मा गांधींनी ही म्हटलं ज्योतिबा फुले हे खरे महात्मा आहेत. जसं की छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव तसं महात्मा म्हटलं की सगळं आलं.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sharad Pawar and Chhagan Bhujbal : भर मंचावर शरद पवारांनी संदेश लिहून दिला, छगन भुजबळांनी गुपचूप वाचला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Mutual Fund SIP : म्युच्यूअल फंडमध्ये दरमहा 15000 रुपयांची एसआयपी केल्यास 1 कोटी किती वर्षात जमा होणार? जाणून घ्या
एसआयपीद्वारे 15000 रुपयांची म्युच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास 1 कोटींची रक्कम किती वर्षात मिळेल, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Sharad Pawar : छगन भुजबळ-शरद पवार यांचा एकाच गाडीतून प्रवासSuresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धसBajrang Sonawane on Santosh Deshmukh | संतोष देशमुख प्रकरणी 2 पोलीस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासाABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 03 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Suresh Dhas PC | सीडीआर काढून कोण कुणाला काय बोलले ते कळेल पण आता आका वाचणार नाही- सुरेश धस
Mutual Fund SIP : म्युच्यूअल फंडमध्ये दरमहा 15000 रुपयांची एसआयपी केल्यास 1 कोटी किती वर्षात जमा होणार? जाणून घ्या
एसआयपीद्वारे 15000 रुपयांची म्युच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास 1 कोटींची रक्कम किती वर्षात मिळेल, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जानेवारी 2025 | शुक्रवार 
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
इन्स्टाग्रामवरुन प्रेम झालं, पण वादाला तोंड फुटलं, वर्ध्यात प्रियकरानं प्रेयसीवर अत्याचार करुन विहिरीत ढकललं
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
धक्कादायक! रेल्वे पोलिसाचा गळा दाबून खून, पहाटेच रेल्वे ट्रॅकवर फेकला मृतेदह; आरोपी फरार
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
छगन भुजबळ सकाळी सीएम फडणवीस अन् सायंकाळी शरद पवारांसोबत! राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले तरी काय?
Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
दिव्यांग मंत्रालय निर्माण झाले, पण मंत्री आणि सचिवही नाही, मानधन कधीच वेळेवर मिळत नाही; बच्चू कडूंचा अध्यक्षपदाचा राजीनामा
Embed widget