Chandrashekhar Bawankule : लाडक्या बहिणींचे पैसे पुरुषांनी घेतले असेल, तर गुन्हा दाखल केला पाहिजे, पैसेही वसूल करावे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना
Chandrashekhar Bawankule : लाडक्या बहिणींचे पैसे पुरुषांनी घेतले असेल, तर गुन्हा दाखल केला पाहिजे, पैसेही वसूल करावे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचना

Chandrashekhar Bawankule : बावनकुळे मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने या संदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे कि ज्या चुकीच्या पद्धतीने लाडक्या बहिणीने लाभ घेतले आहे, त्यांच्याकडून वसुली केली जाणार नाही. हे सरकारने या आधीच स्पष्ट केले आहे. मात्र महिलांचे पैसे जर पुरुषांनी घेतले असेल, तर गुन्हा दाखल केला पाहिजे, पैसेही वसूल केले पाहिजे. अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Minister Chandrashekhar Bawankule) यांनी दिली आहे. राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर पुरुषांनी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून यावर आता कारवाईची मागणी महसूलमंत्री बावनकुळे यांनी केली आहे.
सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा, पण....
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले कि, मंत्रीमंडळातील बदल करण्याचा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातले अधिकार त्या पक्षातील नेत्यांचा आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. मात्र, माझ्यासह मंत्रिमंडळातील सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे की जनतेच्या मनात लोकप्रतिनिधी बद्दल काही वाईटपणा निर्माण होईल, जनतेच्या मनात लोकप्रतिनिधी बद्दल मत खराब होतील, असे वागणे योग्य नाही. यासाठी आम्ही सर्वांनी दक्ष राहिले पाहिजे. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. रोहित पवारांना मीडियामध्ये दिवसभर राहायचं असेल, म्हणून फुसकी मारण्याचा प्रयत्न केला आहे. फोनटॅप करण्यासाठी खूप फॉर्मलिटीज असतात, असे कोणाचेही फोन कोणाला टॅप करता येत नाही. असेही बावनकुळे म्हणाले.
काँग्रेस आणि राहुल गांधींनी ओबीसीसह सर्व जातींचा अपमान केलाय- बावनकुळे
संविधानाने एससी, एसटी आणि इतर अशी जनगणना सांगितली होती. मात्र मागील 50 वर्षापासून ओबीसीची गणना करा, ओबीसी आणि ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा द्या, अशी मागणी होत असताना 50 वर्षे काँग्रेसने सत्तेत असताना कधीच ओबीसी समाजाला न्याय दिला नाही. उलट ओबीसींच्या मतांचा वापर करून घेतला. ओबीसीच्या तीन हजार जाती असून या सर्व जातींचा अपमान काँग्रेस आणि राहुल गांधींनी केला. फक्त जाहीरनामा पुरतं ओबीसींचा विचार करायचा आणि मग वाऱ्यावर सोडून देणे, हीच काँग्रेसचे धोरण होते. पंतप्रधान मोदींनी ओबीसी आयोगला संवैधानिक दर्जा दिला आणि ओबीसी गणनेची मागणी पूर्ण करत आहे. काँग्रेसला ओबीसीचे मत घेण्याचा अधिकार नाही. अशी टीका हि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
कॅबिनेट राज्यमंत्रीबाबत फार वाद नाही. आम्ही काही अधिकार राज्यमंत्र्यांना देत आहोत. कोणते अधिकार राज्यमंत्र्यांना द्यायचे याबद्दल विचार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या संदर्भात कॅबिनेट मंत्र्यांना विचारणा केली आहे. सर्व कॅबिनेट मंत्री त्यांच्या राज्यमंत्र्यांना काय अधिकार देत आहे, हे सांगणार आहोत. महसूल विभागात मी 3000 पेक्षा जास्त सुनावणी राज्यमंत्र्यांकडे सोपवली आहे. अशी माहिती हि चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
संजय राऊत यांच्यात जर हिम्मत असेल तर नाव घेऊन आरोप करावे
संजय राऊत यांच्यात जर हिम्मत असेल तर नाव घेऊन आरोप केले पाहिजे. असे आकडे सांगून काय होणार? सरकार बद्दल बोलताना विचार केला पाहिजे, असे टोमणे मारणे योग्य नाही. जर 75 टक्के मंत्र्यांबद्दल त्यांना आक्षेप असेल तर त्यांनी नाव घेतले पाहिजे. अशी टीका हि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे केलीय. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आमची बैठक झाली, 15 ऑगस्ट पर्यंत सर्व बोगस जन्म दाखले परत घेण्याचे आदेश आम्ही काढले आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी हे कबूल केले आहे की 15 ऑगस्टपर्यंत चुकीचे दिलेले दाखले आम्ही परत घेऊ. असेही ते म्हणाले.
आणखी वाचा























