Chandrakant Patil : तुम्ही दाखवणार असाल तर आम्ही काय गोट्या खेळतो काय? चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्ला
Chandrakant Patil on Sanjay Raut : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली होती. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आक्रमक झाले.
Chandrakant Patil on Sanjay Raut : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने जोरदार टीका केली होती. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आक्रमक झाले. "दिल्ली भाजपवाल्यांच्या बापाची आहे का? आगामी काळात भाजपला दाखवून देऊ", असं संजय राऊत यांनी म्हटलं. दरम्यान, संजय राऊत यांच्या टीकेला भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रकांत पाटील काय काय म्हणाले ?
असं आहे की दाखवणार बघून घेणार, या भाषेचा लोकांना आता कंटाळा आलेला आहे. तुम्ही दाखवणार असाल तर आम्ही काय गोट्या खेळतो काय? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केलाय. पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही आमची तयारी व्यवस्थित केली आहे. तुम्ही लोकांसमोर खोटं मांडलं. एखादी गोष्ट वारंवार वारंवार मांडली की, ती खरी वाटते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आम्हाला फटका बसला. याचं कारण आमच्या 10 जागा अशा आहेत की, 3 हजार ते 23 हजारांच्या फरकाने गेल्या आहेत. त्या 10 आल्या असत्या तर आमच्या 27 आल्या असत्या. तुमच्या 31 च्या 21 झाल्या असत्या.
पश्चिम महाराष्ट्रातही आम्ही त्यांच्यापेक्षा 2 लाख मतांनी जास्त आहोत
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आता झालेल्या निवडणुकीतही आम्ही 127 विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही पुढे आहोत. एकूण महाराष्ट्रामध्ये त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये 2 लाखांचा फरक आहे. मुंबईमध्ये आम्हाला त्यांच्यापेक्षा 2 लाख मत जास्त पडली आहेत. पश्चिम महाराष्ट्रातही आम्ही त्यांच्यापेक्षा 2 लाख मतांनी जास्त आहोत. कोकणातील संपूर्ण पट्टा आम्ही साफ केलाय. ठाणे, कल्याणही आम्ही जिंकलं आहे. पालघर आणि रायगडही आम्ही जिंकलं. हेच तर शिवसना आहे ना. अरे राऊतांनो याचा काही अभ्यास करणार की ऐकणारे लोक वेडे बसलेत? कोकणावर तुमची मुंबईत शिवसेना उभी राहिली. कोकणातील माणूस मिलमध्ये काम करण्यासाठी आला. हॉटेलमध्ये काम करण्यासाठी आला, तो तुमचा वोटर झाला. मग तुम्ही मुंबई जिंकली आणि कोकण जिंकलं, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. काँग्रेसचे एका खासदाराचे 13 खासदार केले, तुम्ही त्यांचं भलं केलं. राष्ट्रवादीचे कधीच 8 आले नाहीत, त्याचेही 8 करुन दिले. तुम्ही मात्र स्वत:चं नुकसान करुन घेतलं. संजय राऊतजी तुम्ही मोठं नुकसान केलं, असंही पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या