एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Bunty Shelke : काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके म्हणाले, नाना पटोले RSS चे एजंट, आता पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस

Bunty Shelke and Nana Patole : काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीये.

Bunty Shelke and Nana Patole : काँग्रेस नेते आणि नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बंटी शेळके यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, पराभव झाल्यानंतर बंटी शेळके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाना पटोले RSS चे एजंट असल्याचं बंटी शेळके म्हणाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या बैठकीत अस्वस्थता देखील जाणवली होती. दरम्यान, आता नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर काँग्रेस पक्षाने बंटी शेळके यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

दरम्यान, बंटी शेळके यांच्या आरोपांना नाना पटोले यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. नाना पटोले म्हणाले, त्यावर मी नंतर बोलले, तो संघटनेतला विषय आहे, त्यावर औषध नंतर करू.  मी लोकशाही वाचवण्यासाठी काम करत आहे, हे गांभीर्य आहे, लोकशाही वाचेल तर देश वाचेल.

बंटी शेळके काय काय म्हणाले होते? 

हस्तक्षेप करून मला उमेदवारी देण्यात आली. हे नाना पटोले यांना पटले नाही. त्यामुळे आपल्या विश्वासातील काही नेते आणि कार्यकर्त्यांमार्फत त्यांनी भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांना त्यांना मदत पुरवली. याशिवाय, बंटी शेळके यांनी नाना पटोलेंवर उमेदवारी विकल्याचाही आरोप केला होता.

बंटी शेळके म्हणाले, राहुल गांधी यांनी उमेदवारी दिल्याने मी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार होतो. पंजा चिन्हावर लढलो. असे असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात एकट्याच्या बळावर निवडणूक लढावी लागली. प्रचारात संघटनेची मदत झाली नाही. पटोलेंनी या मतदारसंघात प्रचारासाठी नेत्यांना पाठवले नाही. ते स्वतः ही प्रचारासाठी आले नाही. कुठलीही मदत केली नाही, अशा शब्दात बंटी शेळके यांनी नेत्यांच्या उपस्थितीत पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली. 

बंटी शेळकेंचा विधानसभा निवडणुकीत पराभव 

मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली होती. भाजपकडून प्रवीण दटके तर काँग्रेसकडून बंटी शेळके रिंगणात होते. याशिवाय अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली होती. मात्र, गेल्या तीन भाजपच्या प्रवीण दटके यांनी या निवडणुकीत विजय मिळवलाय. काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांचा दटकेंनी 11516 मतांनी पराभव केला होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Kailas Gorantyal : काँग्रेसने फक्त तिकीट दिलं अन् नंतर प्रत्येकाला वाऱ्यावर सोडलं, कैलास गोरंट्याल यांचा पक्षाला घरचा आहेर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Mahayuti :विधानसभेची मुदत संपल्यानंतरही राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही-ठाकरेMahadev Jankar Vs Raosaheb Danve : EVM हॅक करता येतं मी स्वत: इंजिनिअर : महादेव जानकरBaba Adhav : बाबा आढाव यांनी उपोषण सोडलं, फुले वाड्यात होतं आत्मक्लेश उपोषणUddhav Thckeray Meet Dr baba Adhav : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बाबा आढाव यांनी पोषण मागे घेतलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
भुजबळांविरोधात निवडणूक लढलेल्या उमेदवाराच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; माणिकराव शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
Amshya Padvi : आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे  गटात राडा
आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंगाचा आरोप, अक्कलकुव्यात भाजप अन् शिंदे गटात राडा
Australia Social Media Ban : तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
तर 275 कोटींचा दंड! जगाला जमलं नाही ते ऑस्ट्रेलियानं करून दाखवलं; 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर नो एन्ट्री
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून ठाकरेंचा टोला, आढाव यांचं उपोषण सुटलं
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; आरसीबीकडून मेगा लिलावात याच खेळाडूवर 12.5 कोटींचा खर्च!
Embed widget