पोलीस संरक्षणासाठी की गाड्या धुण्यासाठी? आमदाराची गाडी धुतानाचा Video टाकत हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला सवाल
महाराष्ट्रात पोलीस कर्मचारी रक्षणासाठी आहेत की आमदारांची गाडी धूण्यासाठी आहेत असा सवाल माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना केलाय.
Buldhana: सध्या राज्यात विधानसभा निवडणूकांसह महिला अत्याचार, राजकोट पुतळा अपघातावरुन राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दरम्यान, विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी आरोप प्रत्यारोपाची एकही संधी विरोधकाला मिळू नये यासाठी प्रयत्न सुरु असतानाच बुलढाण्यात माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी एक पोलीस कर्मचारी धूत असल्याचा व्हिडिओ टाकत सरकारवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्रात पोलीस कर्मचारी रक्षणासाठी आहेत की आमदारांची गाडी धूण्यासाठी आहेत असा सवाल माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना केलाय.
पोलीस कर्मचारी आमदार, लोकप्रतिनिधींच्या गाड्या धुण्यात व्यस्त
राज्यात एकीकडे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. महिलांवर अत्याचार झाल्यावर पोलीस स्थानकात तक्रार घेण्यासाठी 12 - 12 तास पीडितेला थांबावं लागत आहे. तर दुसरीकडे याच महाराष्ट्रात पोलीस कर्मचारी आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या गाड्या धुण्यामध्ये व्यस्त आहेत,असा आरोप एक व्हिडिओ फेसबुक वर टाकून बुळढाण्याचे माजी आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय.
नक्की प्रकरण काय?
बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयासमोर सकाळी चक्क एक पोलीस कर्मचारी त्यांची कार धुताना कॅमेरात कैद झाला आहे. याचा व्हिडिओ हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुकवर टाकत सरकारवर आरोप केले आहेत. खरंतर पोलीस कर्मचारी हे संरक्षणासाठी असतात की गाड्या धुण्यासाठी....? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. आ. संजय गायकवाड यांच्या कार्यालयासमोर पोलीस कर्मचारी आमदारांची गाडी धुतानाचा व्हिडिओ बुलढाण्याचे माजी आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबुक वरून शेअर केला आहे. व या सर्व प्रकारावर त्यांनी सरकारवर आणि पोलिसांवर आरोप केला आहे.
काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी संजय गायकवाड यांच्या घरासमोर एक पोलीस कर्मचारी त्यांची गाडी धूत असल्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी फेसबूकवर टाकत पोलीस यंत्रणेची चाटूगिरी असं लिहीत सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी लिहिलंय,
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा!
महाराष्ट्र पोलीस शर्म करो ! 😡
सद्रक्षणाय , खलनिग्रहणाय हे ब्रीद अंगीकारणारी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे, की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी ?
दोन दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केले होते ! मुख्यमंत्री काय शाळेत जाऊन पहारा देणार आहेत का ?
एस. पी. आरोपीच्या घरी जाऊन बसणार आहेत का?
आज सकाळी या प्रश्नाचे उत्तर मिळाले = पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार आहे . . . . !
पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना.
पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध.
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा 😡
पोलीसांवर आरेरावीची भाषा, आज नवाच प्रताप
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलानं कालच आरेरावीची भाषा केल्याचं पहायला मिळालं होते. आणि आता आता आणखी एक प्रताप समोर आला असून आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलीस कर्मचारी धूत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: