(Source: Matrize)
Buldhana Vidhan Sabha: विधानसभा निवडणुकीला शिंदे गटाच्या संजय गायकवाडांची उमेदवारी धोक्यात? बुलढाणा मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवण्याची मागणी
बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा महिलांसाठी राखीव ठेवावा अशी मागणी करण्यात आलीय.
Buldhana Vidhan Sabha: विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षात इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे. अशातच बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातही राजकीय घडामोडी घडत आहेत. बुलढाण्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, जिजाऊंच्या जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा महिलांसाठी राखीव ठेवावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्या प्रेमलता सोनवणे पाटील यांनी केलीय.
प्रेमलता सोनवणे पाटील यांचा बुलढाणा मतदारसंघावर दावा
विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. त्यामुळं अनेक इच्छुक उमेदवार हे तयारीला लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडी वेगानं घडत आहेत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा गेल्या पाच निवडणुकात शिवसेनेचा गड राहिलेला आहे. बुलढाण्याचे विद्यमान आमदार संजय गायकवाड या मतदारसंघातून पहिल्यांदाच प्रतिनिधित्व करत आहेत. मात्र, आता याच मतदारसंघातील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या प्रेमलता सोनवणे पाटील यांनी या मतदारसंघावर दावा ठोकत राजमाता जिजाऊंच्या जिल्ह्यात बुलढाणा मतदारसंघ हा शिवसेनेने महिलांसाठी कायमस्वरुपी राखीव ठेवण्याची मागणी केलीय. तसेच त्या दृष्टीने त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली असल्याचीही माहिती दिली आहे.
प्रेमलता सोनवणे पाटील बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून लढण्यावर ठाम
पक्षाने जर उमेदवारी नाही दिली तरीही प्रेमलता सोनवणे पाटील या बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून लढण्यावर ठाम आहेत. प्रेमलता सोनवणे पाटील यांनी तशी तयारीही त्यांनी सुरु केली आहे. त्यामुळं आता शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आधीच प्रेमलता सोनवणे पाटील यांनी बंडाचे निशान फडकावलं आहे. त्यामुळं आता बुलढाणा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार ? हा चर्चेचा विषय ठरत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात इच्छुकांची गर्दी
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. इच्छुकांनी गाठीभेटी तयारी देखील सुरु केली आहे. अनेकजण कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याच्या दावा करत आहेत. त्यामुळं सर्वच पक्षात बंडखोरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळं तिकीटांचे वाटप करताना पक्षश्रेष्टींसमोर मोठा पेच निर्माण होणार आहे. कारण कोणला उमेदवारी द्यायची? या प्रश्न उपस्थित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या: