एक्स्प्लोर

गडकरींच्या भेटीनंतर सुधीर मुनंगटीवारांची दिल्लीवारी; जे. पी. नड्डा यांच्या भेटीत नव्या जबाबदारीची धुरा?

Sudhir Mungantiwar : भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची लवकरच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत भेट होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

Sudhir Mungantiwar नागपूर : भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची लवकरच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत भेट होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. जे पी नड्डा यांनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती स्वत: सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. येत्या 19 किंवा 20 तारखेला दिल्लीत ही भेट होण्याची शक्यता आहे.  सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar)  यांना नवीन जबाबदारी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सूतोवाच केलं होतं. त्या अनुषंगाने जे पी नड्डा यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत याच नवीन जबाबदारी वर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

सुधीर मुनंगटीवारांच्या खांद्यावर नव्या जबाबदारीची धुरा?

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीसंध्येला संपन्न झाला असून पुढील दोन दिवसांत जागावाटप देखील होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून माहिती देताना सांगितले. मात्र, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देत, अनेक दिग्गजांना डावलण्यात आलं आहे. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 5 वरिष्ठ नेत्यांना मंत्रीपदातून वगळले आहे. तर, भाजपनेही शिंदे सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या 4 नेत्यांचा पत्ता कट केला आहे. त्यामध्ये, भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि रविंद्र चव्हाण यांचाही समावेश आहे. मात्र, रविंद्र चव्हाण यांना भाजपकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. मग, सुधीर मुनगंटीवार यांचं काय होणार, सुधीर मुनगंटीवारांना नेमकं कशामुळे मंत्रिपद नाकारण्यात आलं, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच, काल(16 डिसेंबरला) सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये दीडतास चर्चा झाली असून त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. दरम्यान त्या भेटीनंतर आता उच्चपदस्थ नेत्यांमध्ये मोठ्या हालचाली केली जात असल्याची चर्चा आहे.   

भाजप कार्यकर्त्यांची चंद्रपूर ते नागपुरपर्यंत पायी यात्रा 

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात चंद्रपूर जिल्ह्यातील दिग्गज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना डावलेले गेल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये खदखद बघायला मिळत आहे. स्वतः मुनगंटीवार यांनी आपण निराश नसून जनसेवा करण्यासाठी सज्ज आहोत, अशी प्रतिक्रिया दिल्यानंतरही कार्यकर्त्यांचा संताप स्पष्टपणे पुढे आलाय. पक्षश्रेष्ठींची भेट घेत मुनगंटीवार यांच्या मंत्रिमंडळात समावेशासाठी आग्रही मागणी करण्यासाठी चंद्रपुरातून भाजप कार्यकर्त्यांनी पायी यात्रा प्रारंभ केली आहे. नागपुरात न्याय न मिळाल्यास हे कार्यकर्ते दिल्लीपर्यंत पायी यात्रा करणार आहेत. मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश न झाल्यास चंद्रपूर जिल्हा वीस वर्ष मागे जाणार असून विकास पुरुष सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे.

सुधीर मुनगंटीवार यांना विशेष जबाबदारी- देवेंद्र फडणवीस 

सुधीर भाऊ आमचे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याशी आमचे बोलणे झाले आहे. पक्षाने त्यांना विशेष जबाबदारी देण्याचे ठरवले आहे. सुधीर  मुनगंटीवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे आमच्या पक्षाने काहीतरी विचार करून त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही, असे स्पष्टोक्ती देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या चर्चेला पूर्णविराम दिला असल्याचे बोलले जात आहे. 

आणखी वाचा 

Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली; अजित पवार-प्रफुल पटेलांना खडे बोल सुनावले, म्हणाले....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India vs Australia 3rd Test : जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
Ajinkya Rahane: टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
Stock Market Crash : शेअर मार्केट भूकंप, सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला, निफ्टीचं काय झालं?
बँकिंग क्षेत्राला जोरदार फटका, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, निफ्टीचं नेमकं काय झालं?
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारणं योग्य नव्हतं: अनिल पाटील
छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजितदादांच्या फोटोला जोडे.... राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas speech Vidhan sabha:  टूंग वाजलं की म्हातारं जातंय,पैसे काढतंय, सभागृहात धडाकेबाज भाषणBhaskar Jadhav vs Vikhe : राज्यपालांच्या अभिभाषणावरुन खडाजंगी; विखे-भातखळकरांना, भास्कर जाधव भिडलेOne Nation One Election Bill Loksabha : लोकसभेत वन नेशन, वन इलेक्शन विधेयक सादर #abpमाझाUddhav Thackeray Nilam Gorhe Infont Video : उद्धव ठाकरे-नीलम गोऱ्हे आमनेसामने; पाहा काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India vs Australia 3rd Test : जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
जैस्वाल, गिल, कोहली, पंत, रोहितला मिळून जमलं नाही ते एकट्या 11व्या क्रमांकावर आलेल्या आकाश दीपनं करून दाखवलं!
Ajinkya Rahane: टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
टीम इंडियाचा धुरंदर अजिंक्य रहाणेची सोलापुरातील अंगणवाडीला भेट, खिचडीही खाल्ली; फोटो व्हायरल
Stock Market Crash : शेअर मार्केट भूकंप, सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला, निफ्टीचं काय झालं?
बँकिंग क्षेत्राला जोरदार फटका, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, निफ्टीचं नेमकं काय झालं?
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारणं योग्य नव्हतं: अनिल पाटील
छगन भुजबळांना जे मिळालंय ते पक्षामुळेच मिळालंय, अजितदादांच्या फोटोला जोडे.... राष्ट्रवादीच्या नेत्याची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray : लाडकी बहीणसाठी आताच निकष का? उद्धव ठाकरेंचा सवाल, भुजबळांबद्दल वाईट वाटतंय, ठाकरेंचा टोला
लाडकी बहीणसाठी आताच निकष का? उद्धव ठाकरेंचा सवाल, भुजबळांबद्दल वाईट वाटतंय, ठाकरेंचा टोला
Bajrang Sonwane: बजरंग बाप्पांनी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी संसदेत रान उठवलं; गंभीर आरोपांची राळ, पोलीस PSI बदलण्याची मागणी
बजरंग बाप्पांनी संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणी संसदेत रान उठवलं; गंभीर आरोपांची राळ, पोलीस PSI बदलण्याची मागणी
Gold Rate Today : सोने चांदी दरात दुसऱ्या दिवशी घसरण, लग्नसराई संपताच दर घसरण्यास सुरुवात,सोने खरेदी करताना काय काळजी घ्यायची?
सोने चांदी दरात दुसऱ्या दिवशी घसरण, लग्नसराई संपताच दर घसरण्यास सुरुवात, सोने खरेदी करताना काय काळजी घ्यायची?
Australia vs India, 3rd Test : जर टीम इंडिया गाबा कसोटीत हरली तर WTC फायनलमधून बाहेर? आता नवीन समीकरण तयार!
जर टीम इंडिया गाबा कसोटीत हरली तर WTC फायनलमधून बाहेर? आता नवीन समीकरण तयार!
Embed widget