एक्स्प्लोर

विधानसभेची खडाजंगी : काँग्रेसचा बालेकिल्ला भाजपचा होणार? अशोक चव्हाणांच्या पक्षांतरानं भोकरची समीकरणं बदलणार

नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यापपैकी आज आपण भोकर विधानसभा (Bhokar Vidhansabha) मतदासंघाची माहिती पाहणार आहोत. या मतदारसंघावर मा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचं वर्चस्व आहे. 

Bhokar Vidhansabha Election : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhasabha Election) लवकरच आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बैठका, दौरे, संवाद सुरु केलाय. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात (Nanded District) देखील राजकीय वातावरण तापलं आहे. नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यापपैकी आज आपण भोकर विधानसभा (Bhokar Vidhansabha) मतदासंघाची माहिती पाहणार आहोत. या मतदारसंघावर माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे भाजपचे खासदार अशोक  चव्हाण यांचं वर्चस्व आहे. 

2019 च्या निवडणुकीत काय स्थिती होती?

भोकर विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ आहे. हा नांदेड लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अशोक चव्हाण हे 1,40,559 मते मिळवून विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार श्रीनिवास उर्फ ​​बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचा पराभव केला होता. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अमिता अशोकराव चव्हाण 1,00,781 मते मिळवून विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी भाजपा पक्षाचे डॉ. माधवराव भुजंगराव किनहालकर यांचा परभाव केला होता.  

यावेळी भोकर मतदारसंघात नेमकं काय होणार? 

2019 च्या निवडणुकीनंतर नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना भाजपकडून राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. त्यामुळं आता भोकर विधानसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार हा चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, यावेळी भोकर विधानसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण (Shreejaya Chavan)निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जातेय. महायुतीकडून भाजपचे तिकीट श्रीजया चव्हाण यांना सुटण्याची शक्यता आहे. तर प्रा संदीपकुमार देशमुख या कार्यकर्त्याने ‘भोकरचा आमदार भूमिपुत्रच हवा’ असा नारा देत श्रीजया चव्हाण यांच्या संभाव्य उमेदवारीला आव्हान दिल्याचे दिसून आले. त्यामुळं आता महाविकास आघाडी कोणाला श्रीजया चव्हाण  यांच्याविरोधात मौदानात उतरवणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे

भोकर विधानसभा मतदारसंघ माहिती

स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून भोकर मतदारसंघाची जुनी ओळख आहे. 2009 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त मते घेत विजय मिळवला होता. त्यानंतर 2014 साली अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण (Amita Chavan) इथून निवडणूकीत उभ्या होत्या. मात्र यावेळेला त्यांचं मताधिक्य वीस हजाराने घटलं होतं. या दरम्यान अशोक चव्हाण नांदेडचे खासदार होते. त्यानंतर 2019 मध्ये अशोक चव्हाण पुन्हा लोकसभेतून विधानसभेच्या मैदानात उतरले. त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भोकर विधानसभा मतदारसंघातून लढवली आणि ते जिंकून आले. अशोक चव्हाण यांना त्यावेळी 1 लाख 40 हजार मतं मिळाली. त्यांच्याविरोधातील भाजप उमेदवार श्रीनिवास गोरठेकर यांना अवघी 43,114 मतं मिळाली होती. 

मतदारसंघातील प्रश्न

भोकर तालुका एकेकाळी सिंचनाने समृद्ध होता. इसापूर धरणाच्या पाण्यावर इथले शेतकरी ऊस, केळी आणि हळद अशी नगदी पिकं घेत असत. मात्र पैनगंगा नदीवर इसापूर धरणाच्या वरच्या बाजूला अनेक बंधारे झाले आहेत. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून इथला सिंचनाचा विकास अपूर्ण राहिल्याचं बोललं जात आहे. सुधा प्रकल्पाचा अद्याप देखील अद्याप विस्तार होऊ शकला नाही.

महत्वाच्या बातम्या:

विधानसभेची खडाजंगी: नांदेड जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती काय? कोणत्या पक्षाचे किती आमदार? सविस्तर माहिती एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget