(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल, असा आहे राहुल गांधी यांचा आजचा कार्यक्रम
Bharat Jodo Yatra: कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. हजारो मशाल हाती घेऊन खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वतात निघालेली ही यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली.
Bharat Jodo Yatra: कन्याकुमारी येथून सुरु झालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. हजारो मशाल हाती घेऊन खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वतात निघालेली ही यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली. राहुल गांधींची यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात देगलूर येथे दाखल झाली आहे. यावेळी त्यांच्या सोबत हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते होते, ज्यांच्या हातात मशाली होत्या. या यात्रेचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात जंगी स्वागत केलं आहे. ही यात्रा आजपासून महाराष्ट्र सुरु झाली असून पुढील 14 दिवस राहुल गांधी हे महाराष्ट्रात मुक्कामी असणार आहेत. यावेळी अनेक कार्यक्रम, सभा आणि चौकसभांचे आयोजन करण्यात आले आहे. यातच आज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रवास कसा असणार आहे, राहुल गांधी यांच्या कुठे सभा आणि कार्यक्रम होणार आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
असा आहे राहुल गांधी यांच्या आजचा कार्यक्रम
राहुल गांधींची यात्रा रात्री महाराष्ट्रात देगलूर येथे दाखल झाली.
सकाळी 8.30 वाजता- नांदेडमधील गुरुद्वारापासून यात्रेला सुरुवात होईल
सकाळी 9.30 वाजता- अटकाळी गावाजवळ विश्रांती.
दुपारी 4 वाजता- पदयात्रेला खतगाव फाट्यापासून सुरुवात होईल.
संध्याकाळी 7 वाजता- संध्याकाळची विश्रांती.
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) उद्देश देश जोडण्याचा आहे. देशात सध्या द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. या भारत तोडोच्या विरोधात भारत जोडो यात्रा आहे. ही पदयात्रा काश्मीरपर्यंत कोणीही रोखू शकत नाही. या पदयात्रेदरम्यान पुढील 14 दिवस महाराष्ट्रातील जनतेचे दुःख समजून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत, असं ते म्हणाले आहेत.
रात्रीची विश्रांती- गोदावरी मणार साखर कारखाना मैदान.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे यात्रेची जाबबादारी देण्यात आली आहे. या यात्रेसाठी नांदेड जिल्ह्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 28 पदाधिकारी नियुक्त केले असून सगळे पदाधिकारी सध्या नांदेडला दाखल झाले आहेत . नांदेड जिल्ह्यातील यात्रा पूर्ण होईपर्यंत ते नांदेडलाच मुक्कामी राहणार आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी घटक पक्षातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांना या यात्रेसाठी काँग्रेस पक्षाकडून आमंत्रण देण्यात आले आहे. भारत जोडो यात्रेमध्ये महाविकास आघाडीमधील नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.