पंजाबनंतर हिमाचल प्रदेश आणि गुजरात जिंकण्यासाठी 'आप' लागली कामाला, लवकरच प्रचाराला करणार सुरुवात
पंजाब निवडणुकीत मोठा विजय (Big Win in Punjab Assembly Election 2022) मिळविल्यानंतर आम आदमी पक्षाने (AAP) आपली व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
पंजाब निवडणुकीत मोठा विजय (Big Win in Punjab Assembly Election 2022) मिळविल्यानंतर आम आदमी पक्षाने (AAP) आपली व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh Election 2022) आणि गुजरातमध्ये (Gujarat Election 2022) होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाने जास्तीत-जास्त जागा जिकंण्यासाठी आपली तयारी सुरू केली आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे नामनिर्देशित मुख्यमंत्री भगवंत मान हे या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीत प्रचार करणार आहेत. आतापर्यंत हिमाचल प्रदेश आणि गुजरात या दोन्ही ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती. मात्र आता या शर्यतीत आम आदमी पक्षही पूर्ण ताकदीने सामील होणार आहे.
सुरतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाने उत्साहित असलेल्या आपने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातची सत्ता मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, हिमाचल प्रदेश हा पंजाबच्या सीमेला लागून आहे. नुकतेच पंजाबमध्ये यश मिळवल्याने याचा प्रभाव हिमाचल प्रदेशवरही दिसू शकतो. म्हणून आप येथे आता पूर्ण तयारीने उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपने 92 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. पक्षाने बहुतेक प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले असून 117 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसला केवळ 18 जागा मिळाल्या आहेत. यामध्येच 16 मार्च रोजी भगवंत मान हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
- कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या नुकसानभरपाईच्या खोट्या दाव्यांमुळे सर्वोच्च न्यायालय चिंतेत, डॉक्टरांकडूनही मिळतंय खोटं सर्टिफिकेट
- World Coronavirus : कोरोनाची नवी लाट! चीनमध्ये लॉकडाऊन, तर रशियात सर्वाधिक मृत्यू; जगभरात 6 कोटी सक्रिय रुग्ण
- Sanjay Raut on BJP : गोवा जिंकलं म्हणून स्वागत झालं, ढोल वाजवले, पण... : संजय राऊत
- HSC Exam Paper Leak : बारावीचा पेपर फुटला; कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक