एक्स्प्लोर

HSC Exam Paper Leak : बारावीचा पेपर फुटला; कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक

HSC Exam Paper Leak : बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आहे.

HSC Exam Paper Leak : राज्यात पेपरफुटीचे प्रकरण थांबण्याची चिन्हं दिसत नाही. बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकाने  बारावी केमिस्ट्रीचा पेपर आपल्या विद्यार्थ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे. 

राज्यात याआधी राज्य सरकारच्या नोकरभरतीत पेपरफुटी झाल्याचे समोर आले होते. आता, थेट बारावीच्या परीक्षेचा पेपर फुटला असल्याचे समोर आले आहे.  शनिवारी बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर झाला होता. मात्र, परीक्षेआधीच हा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर आला होता. मालाडमधील खाजगी क्लासेसच्या शिक्षकाला या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. मुकेश यादव असं या खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. या खाजगी शिक्षकाने आपल्या वर्गात शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना व्हाट्स अॅपवर हा पेपर सुरू होण्याआधीच दिला असल्याची माहिती मिळाली आहे. 

पोलिसांनी या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांची चौकशीदेखील केली आहे. पेपरफुटीसाठी मुकेश यादवसोबत आणखी कोणाच सहभाग आहे का, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला का, याआधीदेखील पेपर फुटलेत का, आदी मुद्यांवरही पोलीस तपास सुरू आहे. पोलिसांकडून आता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. फुटलेला केमिस्ट्रीचा पेपर किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचला याची माहितीदेखील पोलीस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार फक्त तीन विद्यार्थ्यांना हा पेपर मिळाला आहे. बारावी विज्ञान शाखेतील पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बारावीच्या इतर पेपरदेखील फुटले का, याची चौकशी ही करण्यात येत आहे. इतर पेपरही फुटले असल्यास त्याची व्याप्तीही मोठी असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात असून इतर बाबींच्या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे. 

लातूरमध्ये एमबीबीएसचा पेपर फुटला

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (MBBS Exam) हिवाळी परीक्षा सुरू आहेत. या परीक्षेत एमबीबीएसच्या द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या मायक्रोबायलॉजीचा पेपर फुटला असल्याचे समोर आले. हा पेपर अगदी जसाच्या तसा नोव्हेंबरमध्ये महाविद्यालयात घेण्यात आलेल्या सराव परीक्षेत आला होता. मायक्रोबायोलॉजी या विषयाचा पेपर तयार करण्याची जबाबदारी महाविद्यालयातील संबंधित प्राधापकांना दिली होती. मात्र, प्राध्यापकांकडूनच हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. तरी, तात्पुरती ही परीक्षा रद्द करण्यात आली.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant : देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
SIP Investment :...तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, तोटा होण्यापूर्वी सावधानतेची गरज, अन्यथा तो निर्णय ठरेल चुकीचा...
...तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, मग सुरक्षित पर्याय कोणता? तज्ज्ञ म्हणाले...
Tanaji Sawant: तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने चक्रं फिरवली, ऋषिराज सावंतांचं विमान बँकॉकला लँड न होताच माघारी फिरलं
तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी चक्रं फिरवली, मुलाचं बँकॉकला चाललेलं विमान हवेतून माघारी फिरलं
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rushikesh Sawant :  Tanaji Sawant यांचा मुलगा ऋषिकेष सावंत पुण्यात परतला, नेमकं प्रकरण काय?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 7.30 AM : ABP Majha : Maharashtra NewsTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant : देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना संयम ठेवा, उदय सामंतांचा जरांगेंना सल्ला
SIP Investment :...तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, तोटा होण्यापूर्वी सावधानतेची गरज, अन्यथा तो निर्णय ठरेल चुकीचा...
...तर एसआयपीमधील गुंतवणूक ठरेल नुकसान करणारी, मग सुरक्षित पर्याय कोणता? तज्ज्ञ म्हणाले...
Tanaji Sawant: तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने चक्रं फिरवली, ऋषिराज सावंतांचं विमान बँकॉकला लँड न होताच माघारी फिरलं
तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी चक्रं फिरवली, मुलाचं बँकॉकला चाललेलं विमान हवेतून माघारी फिरलं
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
पुण्याचा पारा 38 अंशांपर्यंत! येत्या 2 दिवसांत राज्याचे तापमान कसे राहणार? वाचा IMD चा अंदाज
Share Market : डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारताच्या शेअर बाजाराला हादरे, गुंतवणूकदारांना धक्के सुरु,7.68 लाख कोटी बुडाले
Share Market : शेअर बाजारातील घसरण थांबेना,7.68 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांना धक्के सुरुच
Gold Rate : डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारतात सोन्याच्या दरात उसळी, सोनं 90 हजारांच्या उंबरठ्यावर
डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् भारतात सोन्याच्या दरात उसळी, सोनं 90 हजारांच्या उंबरठ्यावर
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक टक्के निधी राखीव ठेवा, राज्य शासनाचे निर्देश
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
अनैतिक संबंधातून गरोदर, 18 वर्षीय तरुणीची ओढणीने गळा आवळून हत्या, विट भट्टी मालकाला बेड्या
Embed widget