एक्स्प्लोर

Baramati Anonymous Letter: कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं, बारामतीत पुन्हा निनावी पत्र व्हायरल; थोरल्या पवारांवर गंभीर आरोप

Baramati Anonymous Letter: कोणाच्या खांद्यावर, कोणाचं ओझं या मथळ्याखाली हे पत्र संपूर्ण बारामतीत व्हायरल करण्यात आलं आहे. या पत्रातून थोरल्या पवारांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Baramati Anonymous Letter: पुणे : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) तोंडावर बारामतीत (Baramati) निनावी पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झालं आहे. या पत्रातून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. "कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं" या मथळ्याखाली 'गब्बर' नावानं हे पत्र व्हायरल झालं आहे. दरम्यान, याआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता त्यांना उद्देशून एक पत्र व्हायरल झालं होतं. यानंतर आता शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करणारं पत्र बारामतीत व्हायरल होतं आहे.  

कोणाच्या खांद्यावर, कोणाचं ओझं या मथळ्याखाली हे पत्र संपूर्ण बारामतीत व्हायरल करण्यात आलं आहे. या पत्रातून थोरल्या पवारांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे पत्र नेमकं कुणी लिहिलंय? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, व्हायरल होणाऱ्या पत्रामुळे संपूर्ण बारामतीत खळबळ माजली आहे. तर, राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहेत. 

पत्रात नेमकं काय म्हटलंय? 

"नमस्कार बारामतीकर... मी आज पुन्हा आपणासमोर बारामतीध्ये चर्चेला असणाऱ्या सुप्त गोष्टी मांडत आहोत. ज्या मोठ्यानं आणि धाडसानं बोलणं म्हणजे, साहेबांच्या विचारांना चॅलेंज आहे. आणि न बोलणं म्हणजे, तोंड दाबून लाथा बुक्क्यांचा मार, जो आपण भोळ्या भाबड्या बारामतीकरांना भावनिक करून लोकसभेला दिला. त्याचे दुष्परिणाम असे की, आमच्या ताई निवडणुकीपूर्वी खुप शुद्ध बोलून बेशुद्ध करायच्या (आश्वासन द्यायच्या) मात्र आता कार्यकर्त्याचे येणारे फोनच उचलत नाहीत. तुम्ही तर आता नवख्या लेकराला खुर्ची देवून राजकारणाचा आणि तुमच्या विश्वासार्हतेचा पोरखेळ करून संगीतखुर्ची मांडत आहात.", असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. 

"बारामतीनं आपणास चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याकरता भरभरून प्रेम दिलं. तुम्ही तुमचा वारसा दादांना दिला, तुमचं मार्गदर्शन आणि दादांच परीश्रम यातुन बारामतीचा विकास झाला, मग दादांनीही आपलं कौशल्य दाखवत इतर तालुक्याच्या तुलनेत दहा पटीने बारामतीचा विकास केला. मग एका नातवाला राजकारणात आणण्याचा प्रयोग तुम्ही केला आणि जिल्हा परिषद सदस्य केला मग अनुभव आल्यानंतर त्याला आमदार केला आता तो नातुही तिकड सेट झालाय. मात्र ही विषाची परिक्षा कशासाठी की आता आणखीण एका नातवाला डायरेक्ट आमदार करून विकास भकास करायला निघालाय...", असं पत्रात म्हटलं आहे. 

"त्यामुळेच तर, दलित आणि मुस्लीमांमध्ये खोट भितीचं आणि धार्मिक तेढाचं वातावरण पसरवुन संभ्रम निर्माण करीत आहात आणि तुमच्याच पुतण्याला (दादांना) जो तुमच्याच विचाराचा वारसदार आहे त्याला खलनायक बनवण्याकरीता फतवे काढायला लावत आहात. संविधान बदलण्याच्या दाट शक्यता आहेत असा प्रचार करीत आहात. साहेब, लोकसभा निवडणुकीत आपण किती आश्वासने दिली की आम्ही निवडुन आल्यायवर कामे, टेंडर दलित मुस्लीम बहुजनांना देवु मात्र आता मिशीवाले, खरड्या दाढीवाले लाभार्थीच मलिदा खातायत व लोकसभेला पळणारे कार्यकर्ते वाऱ्यावर फिरतायत. तात्पर्य काय की खरी मलिदा गँग तुपाशी व कार्यकर्ते उपाशी.", असं पत्रात लिहिलं आहे. 

पत्रात पुढे लिहिलं आहे की, "साहेब, तुमच्या काळजाचा तुकडा असणाऱ्या निवृत्त मुंबई पोलिस अधिकाऱ्याने भारताचा शत्रु असणाऱ्या देशद्रोही व मुंबई बॉम्बस्फोटा मधील मुख्य आरोपीचे किमान 2900 कोटी रूपये स्थावर संपत्तीमध्ये गुंतवणवणुकीचे प्रकरण आपण किती शिताफीने दाबले त्यासंबंधी महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन तत्कालीन विरोधी पक्षनेत्याने एका बारामतीच्या वकीलाच्या व दोन पत्रकारांच्या पेन ड्राईव्ह, दस्त व माहितीच्या आधारे गाजवले त्यावेळी तर आपणाकडेच सत्तेचा सर्व चाव्या होत्या आणि तुम्हीच सजवलेले सगळे मंत्रीमंडळ होते पण या पापी देशद्रोहयावर देखील आपण मेहरनजर केली आणि प्रकरण जैसे थे झाकले."

"ज्यावेळी मराठा आरक्षणाचे आंदोलन जोर धरत महाराष्ट्र भर पेटले होते त्यावेळी तुमच्या घरातील एका नातवाने तुमच्यासमोर उर काढला व त्याने एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा आरक्षणाचे समर्थन करीत, एक ट्वीट केले त्यावेळी तुम्ही त्याच्यावर रागाने डोळे वटारले. व नंतर तर तुम्ही म्हणाला की लहान मुलांच्या गोष्टी मी मनावर घेत नाही मात्र आता तुम्ही एका दुसऱ्या नातवाला त्याच्या पेक्षा लहानग्याला (दादांचा पुतण्या) पुढं करून बारामतीचा आमदार करून आमच्यावर जबरदस्तीने लादण्याच्या प्रयत्नात आहात. दुसऱ्या नातवाने (दादांचा मुलगा) तर पाच वर्षापुर्वी खासदारकीची निवडणुक लढवली मात्र या नातवाला तर जनतेचे कसलेच प्रश्न कळत नाहीत काही जरी विचारलं तरी एकच उत्तर ! उदया बारामतीच्या जनतेने त्याचेकडुन कसल्या विकासाची अपेक्षा करायची? साहेब तुम्हीच सांगा, हि सगळी तुमच्याच रक्ताची माणसं, दादांच्या कामाची, अनुभवाची तुलना (दादांचा पुतण्या) नवख्या पोराशी होवू शकते का हो? तुमच्या घरगुती कलहापायी आम्हा बारामतीकरांवर हे ओझ लादु नका. ही लढाई फक्त तुमच्या घरातील श्रेयवादाची नाही तर ही लढाई बारामतीकरांच्या भवितव्याची आहे. व्यावहारीक विचार करा आणि आम्हांस गृहीत धरण अस बंद करा, तुम्हीपण. आणि हो मागच्या पत्रात दादांवर बोललो आज तुमच्यावर कारण जे खरं आहे ते मी बोलणारच.", असं पत्रात लिहिलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : 1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
Share Market : शेअर मार्केटसाठी आजचा दिवस महत्वाचा, मार्केटमध्ये नवा विक्रम होणार?  या शेअर्सला येणार अच्छे दिन
शेअर मार्केटसाठी आजचा दिवस महत्वाचा, मार्केटमध्ये नवा विक्रम होणार?  या शेअर्सला येणार अच्छे दिन
Mumbai Metro Phase 3 : मुंबईकरांसाठी खूशखबर! मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हिरवा कंदील, सूत्रांची माहिती
मुंबईकरांसाठी खूशखबर! लवकरच मेट्रो 3 चा पहिला टप्पा सेवेत दाखल होणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता
Pitru Paksha 2024: पितृपक्षात कोणत्या गोष्टी केल्यास तुमचे पूर्वज नाराज होतील, कोणत्या कृतीने पूर्वज खुश होतील?
पितृपक्षात कोणत्या गोष्टी केल्यास तुमचे पूर्वज नाराज होतील, कोणत्या कृतीने पूर्वज खुश होतील?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Controversial Statement : धमकी म्हणजेच राहुल गांधींच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार, सामनातून हल्लाबोलसकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 19 Sept 2024EPF One Lac : ईपीएफमधून काढता येणार 1 लाख रुपये, मर्यादा वाढवलीABP Majha Headlines : 7.00 AM : 19 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : 1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
1500 रुपयांसाठी अगतिक लाडक्या बहिणींचा रात्रभर उघड्यावर मुक्काम, नंदुरबारमधील विदारक घटना
Share Market : शेअर मार्केटसाठी आजचा दिवस महत्वाचा, मार्केटमध्ये नवा विक्रम होणार?  या शेअर्सला येणार अच्छे दिन
शेअर मार्केटसाठी आजचा दिवस महत्वाचा, मार्केटमध्ये नवा विक्रम होणार?  या शेअर्सला येणार अच्छे दिन
Mumbai Metro Phase 3 : मुंबईकरांसाठी खूशखबर! मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हिरवा कंदील, सूत्रांची माहिती
मुंबईकरांसाठी खूशखबर! लवकरच मेट्रो 3 चा पहिला टप्पा सेवेत दाखल होणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता
Pitru Paksha 2024: पितृपक्षात कोणत्या गोष्टी केल्यास तुमचे पूर्वज नाराज होतील, कोणत्या कृतीने पूर्वज खुश होतील?
पितृपक्षात कोणत्या गोष्टी केल्यास तुमचे पूर्वज नाराज होतील, कोणत्या कृतीने पूर्वज खुश होतील?
Inflation : गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहणार, सणासुदीत सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, सरकारचा दावा
गहू, तांदूळ, साखर आणि खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहणार, सणासुदीत सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, सरकारचा दावा
Pune Crime : शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
Himesh Reshammiya Father Death : हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडील संगीतकार-निर्माते विपिन रेशमियांचे निधन
हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडील संगीतकार-निर्माते विपिन रेशमियांचे निधन
Stree 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
Embed widget