एक्स्प्लोर

Bachchu Kadu : शेतकऱ्यांच्या डोक्यात हिरवा, निळा, भगवा घातलाय, कापसाचा भाव एक हजाराने पडला तरी संताप नाही; बच्चू कडू यांची खंत

Kalyan Lok Sabha Election : या देशात कुठल्यातरी धर्माचा माणूस दंगलीत मेला तरी त्यावर चर्चा होते, पण साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली यावर मात्र काहीही बोललं जात नाही असं आमदार बच्चू कडू म्हणाले. 

ठाणे : निवडणूक सुरु झाली आणि कापसाचे भाव हजार रुपयाने कमी झाले तरी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट का नाही, कारण त्याच्या डोक्यात निळा भगवा हिरवा घातलाय अशी खंत प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी व्यक्त केली. निवडणूक मुद्द्यावर झाली पाहिजे, धर्म आणि जातीवर होता कामा नये असंही ते म्हणाले. निवडणूक आमच्या हक्कांवर, आमच्या वेदनेवर झाल्याचं दिसत नाही अशी खंत बच्चू कडू यांनी कल्याणामध्ये व्यक्त केली. बच्चू कडू भिवंडी लोकसभेचे उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचार सभेसाठी आले होते . यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजपावर सडकून टीका केली. 

मुंबईतली सहा हजार एकर जमीन केवळ सहा लोकांजवळ

आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, 34 हजार एकरावर असलेल्या मुंबईमधील सहा हजार एकर जमीन फक्त सहा लोकांजवळ आहे. या जमिनीला सील का लावला जात नाही? मुंबईतील झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस साधं पाय पसरू शकत नाही. त्याला राहायला घर नाही. अन्न, वस्त्र निवाऱ्यामधील निवारा कुणी हिसकावला? जर सहा हजार एकर जमीन सहा लोकांजवळ राहत असेल, कष्ट करणाऱ्या लोकांना घरे मिळत नसतील, मग हे प्रश्न लोकांनी सत्ताधाऱ्यांना विचारले पाहिजेत. धर्म आणि जातीच्या आडून आमच्या हक्काची लढाई थांबता कामा नये. त्या सामान्य माणसाची लढाई अधिक मजबुतीने उभी राहिले पाहिजे. 

धर्माच्या दंगलीत मेलेल्या माणसाचा उहापोह होतो, पण साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या करतात त्याबाबत कुणी काही बोलत नाही अशी खंतही आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. 

साडेतीन लाख शेतकऱ्यांची आत्महत्या

बच्चू कडू म्हणाले की, काँग्रेस आणि भाजपा हे दोघं धर्माचे नातेगोते जुळवतात. या भारतात कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ते कटपर्यंत ज्या काही हत्या झाल्या त्या शेतकऱ्यांच्या आणि मजुरांच्या झाल्या. अनेक बेरोजगारांनी आत्महत्या केल्यात. तो हिंदू आहे का मुसलमान आहे याचा शोधाशोध घेण्यापेक्षा तो मरतोय कोण हे महत्त्वाचं आहे. हे आमचे नेते लोक सांगत नाहीत. एखादा धर्मातला माणूस कुठल्यातरी दंगलीत मेला तर उहापोह होतो, पण साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या करून मरतायत याची साधी बातमी होत नाही याचं दुःख आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 15 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सMahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
प्रवाशांवर भाडेवाढीची टांगती तलवार, एसटी पाठोपाठ टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची मागणी, नेमकी किती वाढ होणार?
मुंबईकरांना प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार, टॅक्सी अन् ऑटोरिक्षा संघटनांची भाडेवाढीची मागणी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
Embed widget