विधानसभेच्या तयारी लागा, देवेंद्र फडणवीसांचे मराठवाड्यातील आमदारांना आदेश, सागर बंगल्यावर पार पडली बैठक
Devendra Fadnavis, Mumbai : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर या निवासस्थानी आज मराठवाड्यातील आमदारांची बैठक पार पडली.
Devendra Fadnavis, Mumbai : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर या निवासस्थानी आज मराठवाड्यातील आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणावर आणि संघटनात्मक बाबींवर देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांसोबत चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला मोठा फटका बसला. यामुळे आता विधानसभेसाठी सर्वांनी तयारीला लागा,असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सर्व आमदारांना दिले. तसेच महायुती म्हणून आपल्याला विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचं आहे, असं देखील आजच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना सांगितले.
मराठवाड्याच्या पाण्यासंदर्भात चर्चा झाली
भाजप आमदार संभाजी पाटील निलंगेकर बैठक पार पडल्यानंतर म्हणाले, मराठवाड्यातील विविध विकास कामांच्या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. अनेक जिल्ह्यांमध्ये काही काम काही कारणास्तव प्रलंबित आहेत. तांत्रिकदृष्ट्या त्या कामांना अडचणी येत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेतील कामाला गती कशी देता येईल,या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या बाबतीत चर्चा झाली. मराठवाड्याच्या पाण्यासंदर्भात चर्चा झाली.
भारतीय जनता पार्टीने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला
मराठवाड्याला न्याय कसा देता येईल अशी त्यांनी भूमिका घेतली. निवडणुकीला जर डोळ्यासमोर ठेवलं तर विकासात्मक प्रश्न जे असतात ते प्रश्न मार्गी लावायचे असतील. यापूर्वी सुद्धा भारतीय जनता पार्टीने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. भारतीय जनता पार्टीने अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक भूमिका ठेवली आहे. विरोधी पक्षाच्या वतीने जाणीवपूर्वक हा प्रश्न कसा भिजत ठेवता येईल अशी विरोधी पक्षाची भूमिका आहे, असंही संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या बैठकीतील प्रमुख मुद्दे
मराठवाड्यातील आमदारांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी केली चर्चा
मराठा आरक्षण, प्रलंबित विकासकामे यांवर झाली चर्चा
संघटनात्मक बाबींवर आमदारांनी केली चर्चा
विधानसभा निवडणुकीत महायुती म्हणून सामोरे जाण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश
देवेंद्र फडणवीसांचे मराठवाड्यातील आमदारांना आदेश
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला मोठा फटका बसला. यामुळे आता विधानसभेसाठी सर्वांनी तयारीला लागा,असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सर्व आमदारांना दिले. तसेच महायुती म्हणून आपल्याला विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचं आहे, असं देखील आजच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी सर्व आमदारांना सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray vs Maratha Protest : राज ठाकरे अन् मराठा आंदोलकातील वाद थांबता थांबेना,धाराशिवमध्ये प्रतिकात्मक पुतळा जाळला,पोलिसांची माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की