एक्स्प्लोर

Blog : पालकत्वाची नवी परीक्षा: मोबाईलच्या दुनियेत मुलांना सावरताना

आजच्या डिजिटल युगात लहान मुलांमध्ये मोबाईल, टॅबलेट आणि टीव्हीचा वापर झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या "स्क्रीन टाइम" मुळे अनेक मानसिक व शारीरिक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे पालक म्हणून आपण सजग राहणं आणि योग्य दिशा देणं ही काळाची गरज बनली आहे.

फक्त “स्क्रीन टाइम कमी करा” असं म्हणणं पुरेसं ठरत नाही. कारण लहान मुलं अतिशय बारकाईने निरीक्षण करतात आणि वडीलधाऱ्यांचं वर्तन नकळत आत्मसात करतात. जर आपणच सतत मोबाईल वापरत असू, तर त्यांना वाटतं – "आई-बाबांना चालतं, मग आपल्यालाही काही हरकत नाही." म्हणूनच, ज्या बदलाची आपण मुलांकडून अपेक्षा करतो, तो बदल आपल्यापासून सुरू होणं आवश्यक आहे.

स्क्रीन टाइम कमी करायचा असेल, तर काही मुद्दे लक्षात घ्यायला हवेत:

  • मुलांच्या समोर स्क्रीनचा वापर शक्यतो टाळावा.
  • ज्या खोलीत मुलं असतील, तिथे स्क्रीनचा वापर मर्यादित करावा.
  • जर वर्क फ्रॉम होम मुळे स्क्रीन वापर आवश्यक असेल, तर स्पष्टपणे सांगावं – "हे माझं काम आहे, म्हणून मी लॅपटॉप वापरतो."
  • लहान मुलं पाहून शिकतात. म्हणून त्यांच्यासमोर आपण जे वागतो, ते जबाबदारीने आणि विचारपूर्वक असणं गरजेचं आहे.

शाळेत मुले ४ ते ६ तासच असतात. शाळा मूलभूत सवयी घडवते, पण त्या पक्क्या करण्यासाठी घरातील वातावरण अत्यंत महत्त्वाचं ठरतं. जर शाळा आणि घर यांच्यात समन्वय नसेल, तर मुलं गोंधळतात आणि शाळेतील शिक्षणाचा परिणाम कमी होतो. म्हणूनच शाळा आणि घर यांची जबाबदारी समान आहे – हे दोघं मिळूनच खरा आणि सकारात्मक बदल घडवू शकतात.

मुलांना मोबाईलऐवजी कशात गुंतवायचं?

मुलांना गुंतवणं म्हणजे त्यांना फक्त काहीतरी दाखवून शांत ठेवणं नव्हे. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खालील गोष्टी उपयुक्त ठरतात:
त्यांच्यासोबत वेळ घालवा, संवाद साधा, मैदानी खेळ, चित्रकला, हस्तकला यासारख्या क्रियाशील अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी करा. पुस्तकं वाचून दाखवा किंवा गोष्टी सांगा, त्यांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करा आणि त्यांच्या उत्तरांना महत्त्व द्या
मोबाईलचा अतीवापर मुलांच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम करतो. ते पटकन विचलित होतात, एका गोष्टीत लक्ष लागणं कठीण जातं आणि अभ्यासात अडथळा निर्माण होतो.

खूप पालक आज मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना मैदानी खेळांपासून दूर ठेवतात. पण खेळणं, पडणं, उठणं – हेच त्यांच्या अनुभवातून शिकण्याचा (experiential learning) भाग आहे. चुकून शिकायला दिलं पाहिजे, तेव्हाच खरा विकास होतो.

एक अनुभव…
मी एका NGO मध्ये काम करत असताना एका पालकांचा अनुभव ऐकला. त्यांचा मुलगा लहानपणापासून मोबाईलशिवाय झोपू शकत नसे. तो उशाखाली मोबाईल ठेवून झोपायचा आणि रात्री मध्ये उठून त्यावर व्हिडिओ पाहायचा. सुरुवातीला पालकांना त्याचं कौतुक वाटायचं – “किती हुशार आहे आपला मुलगा!” पण जसजसा तो मोठा झाला, तसतसे या सवयीचे दुष्परिणाम दिसू लागले. त्याचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं, चिडचिड वाढली होती आणि त्याच्या झोपेच्या सवयी बिघडल्या होत्या. पालकांचा संघर्ष वाढला आणि मग त्यांना या सवयीचे गांभीर्य लक्षात आलं.
मुलांच्या संगोपनात तणावमुक्तता, संवाद, आणि क्रियाशील वेळ याला फार महत्त्व आहे. संतुलित दिनचर्या आणि योग्य मार्गदर्शनाने आपण मुलांचा मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास साधू शकतो. त्यासाठी पालकांनी सजग आणि सक्रिय भूमिका घ्यावी लागते.
आजच सुरुवात करूया — आपल्यापासून!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar :  उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget