सुरेश धसांची दुटप्पी भूमिका भाजपच त्यांच्याकडून वदवून घेतंय अशी शंका, अंजली दमानियांची धसांवर टीका, म्हणाल्या..
कापूस साठवण बॅग खरेदीत खालपासून वरपर्यंत रेट फिक्सिंग केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

Anjali Damania:संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे (Dananjay Munde) यांच्या राजीनामाच्या मागणीचा दबाव वाढत असताना आज कापूस साठवण बॅग खरेदीत रेट फिक्सिंगचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोपही होत आहे .यात संशयाची सुई धनंजय मुंडेंवर असल्याने राजकीय वातावरण तापला आहे .दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे (Anjali Damania).दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असताना सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर दुटप्पीपणा भूमिका घेतल्याचा आरोप होतोय .यावरही अंजली दमानिया बोलल्या असून संतोष देशमुख प्रकरणासह सूर्यवंशी प्रकरणातही सुरेश धस यांची दुटप्पी भूमिका पाहायला मिळते असं त्या म्हणाल्यात . एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रिय योजनांना ब्रेक लावून त्यांना कॉर्नर करण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही दमानिया यांनी केलाय .
कापूस साठवण बॅग खरेदीत खालपासून वरपर्यंत रेटफिक्सिंग
कापूस साठवण बॅग खरेदीत खालपासून वरपर्यंत रेट फिक्सिंग केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे .कॉटन स्टोरेज बॅग मधील जो घोटाळा आहे तो कसा फिक्स होता याचे उदाहरण देत हे सगळे फिक्स होते .सराईतपणे केलेला हा घोटाळा आहे .त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीची मी पुन्हा एकदा मागणी करते असं त्या म्हणाल्या .18 जानेवारीला किंमत किती असावी ती 1250 .मग जीआर तेवढ्यातच निघतो .टेंडर पण तेवढाच काढलं जातं .मग वर कॉर्डर देखील त्याच किमतीची निघते .हे जे एबीपी माझाने दाखवले ते असेच झाले आहे .असेही तर म्हणाल्या . .
सुरेश धस यांचा दुटप्पीपणा दोन्ही केसमध्ये दिसतो
सोमनाथ सूर्यवंशी यांची एवढ्या दुर्दैवी पणे हत्या झाली .यात जे जे अधिकारी दोषी असतील त्यांना नुसते सस्पेन्शन करून चालणार नाही .त्यांच्यावर सदोष मनुष्यपदाचा गुन्हा दाखल करायला हवा अशी त्यांच्या कुटुंबीयांची मागणी आहे आणि त्याला माझे पूर्ण समर्थन आहे .नुसते सस्पेन्शन करून काय होणार आहे ?त्यांना घरबसल्या पगार मिळणार आहे .सस्पेन्शन संपून त्यांना पुन्हा कामावर घेण्यात येईल .कामावर आल्यानंतर पुन्हा ते तसेच करणार .हे चालणार नाही .त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे .सुरेश धस यांचा दुटप्पीपणा दोन्ही केसेस मध्ये आपण बघतो .जेव्हा संतोष देशमुख केस मध्ये बोलायचं असतं तेव्हा म्हणतात सातपुडा बंगल्यातून खंडणीचा तीन कोटींचा व्यवहार झाला .काल ते म्हणत होते धनंजय मुंडे यांचा राजीनामाची मागणी माझी नाही .सूर्यवंशी केस प्रकरणांमध्ये एकीकडे लॉन्ग मार्चमध्ये जातात, दुसरीकडे म्हणतात पोलिसांच्या विरोधात कुठलाही गुन्हा दाखल करू नका .ही दुटप्पी भूमिका कुठेतरी भाजपच त्यांच्याकडून वधवून घेत आहे का अशी शंका येऊ लागली आहे, असे अंजली दमानिया म्हणाल्या .
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

