एक्स्प्लोर

Anitha Vanglapudi : चंद्रबाबूंच्या मंत्रिमंडळात गृहखातं महिलेकडे, अनिथा वंगलाडींनी पदभार स्वीकारताच पुढचा प्लॅन सांगितला

Anitha Vanglapudi : तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी (12 जून) चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, आता त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करत खातेवाटप देखील केले आहे.

Anitha Vanglapudi : तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी (12 जून) चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, आता त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करत खातेवाटप देखील केले आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यानंतर जनसेना प्रमुख आणि अभिनेता पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान, चंद्रबाबू यांच्या मंत्रिमंडळातील महत्वाची बाब म्हणजे त्यांनी गृहखात्याची जबाबदारी महिलेवर सोपवली आहे. अनिथा वंगलाडींनी गृहखात्याचा पदभार स्वीकारला आहे. 

कोण आहेत अनिथा वंगलाडी? 

अनकापल्ले जिल्ह्यातील पायकाराओपेट या विधानसभा मतदारसंघातून अनिथा वंगलाडी निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे विशाखापट्टणम जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघातून एकमेव आमदार आहेत, ज्या मंत्री बनल्या आहेत. अनिथा यांनी निवडणुकीत 120,042 मते मिळवून मोठा विजय मिळवला, त्यांच्या प्रतिस्पर्धी, YSRC च्या कंबाला जोगुलु यांना 76,315 मते मिळाली. त्यामुळे अनिथा यांनी जवळपास 45 हजार मतांनी विजय मिळवलाय. राजकारणात रुची असल्यामुळे त्यांनी वयाच्या 34 व्या वर्षी नोकरीचा राजीनामा दिला आणि राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.  त्यांचा राजकीय प्रवास 2012 मध्ये गावपातळीपासून सुरू झाला, जिथे त्यांच्या वक्तृत्व कौशल्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले. टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी प्रोत्साहन दिल्याने त्यांना 2014 च्या निवडणुकीत पायकारावपेट येथून आमदार म्हणून लढण्याची संधी देण्यात आली. त्यांनी YSRC उमेदवार चेंगला वेंकट राव यांच्यावर 2,828 मतांच्या फरकाने विजय मिळवला.

राज्यातील गांजा तस्करांविरोधात कठोर कारवाई करणार

दरम्यान, गृह खाताच्या पदभार स्वीकारताच अनिथा वंगलाडी यांनी मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे म्हटले आहे. शिवाय त्यांनी राज्यातील गांजा तस्करांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. महिलांवरील हिंसाचार हे भय निर्माण करण्याचे साधन आहे आणि त्यावर कठोरपणे लक्ष दिले पाहिजे. महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यासाठी टीडीपी सरकार महिला संघटनांचा सल्ला घेईल, असे वंगलाडी यांनी सांगितले आहे. 

पोलीस अधिकाऱ्यांवर पक्षपाती कारवाई करणार नाही

दरम्यान, अनिथा वंगलाडींनी यांनी यावेळी पदभार स्वीकारताना वायएसआर काँग्रेस पक्षावर टीका केली. दिशा कायद्याच्या अंमलबजावणीवरुन त्यांनी निशाणा साधलाय. आमचे सरकार पोलीस अधिकाऱ्यांवर पक्षपाती कारवाई करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. लोकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी त्यांनी व्यक्त केली. पोलिस अधिकाऱ्यांना कायद्याने लोकांसाठी काम करण्याचा सल्लाही  अनिथा वंगलाडी यांनी दिला आहे. TDP सरकार पगार आणि थकबाकीशी संबंधित सर्व समस्या सोडवेल. पोलीस खात्यात सुधारणा करण्याच्या योजनांबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Vishal Patil on Majha Katta : उद्धव ठाकरे फुटलेल्या 40 आमदारांना भेट देत नव्हते, पण चंद्रहार पाटलांना भेटून उमेदवारी जाहीर झाली : विशाल पाटील

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget