मोठी बातमी : माझ्या पेन ड्राईव्हमध्ये सर्व पुरावे, फडणवीसांकडे क्लिप्स असतील तर जनतेसमोर आणाव्यात, अनिल देशमुखांचे थेट चॅलेंज
"काल मी सांगितले होते की फडणवीसांनी मला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार विरोधात अफिडेविट करण्यास सांगितले होते. मी ते पुराव्या शिवाय बोललेलो नाही.(हातातला पेन ड्राईव्ह दाखवत) पेन ड्राईव्ह मध्ये सर्व पुरावे आहेत"

Anil Deshmukh on Devendra Fadnavis : "मला उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले असं आरोप करण्यास सांगण्यात आलं होतं. मी तो आरोप केला नाही. तसेच आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियानवर बलात्कार करून बाल्कनीतून ढकलून दिल्याचा आरोप सुद्धा करण्यास सांगण्यात आले, पण मी ते आरोप केले नाहीत, असा सनसनाटी दावा महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुख यांनी केला आहे. शिवाय अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केले होते. त्यानंतर माझ्याकडे क्लिप्स आहेत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे क्लिप्स आहेत असं म्हटल्यानंतर आता अनिल देशमुखांनी थेट चॅलेंज दिलं आहे.
काय म्हणाले अनिल देशमुख ?
"काल मी सांगितले होते की फडणवीसांनी मला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार विरोधात अफिडेविट करण्यास सांगितले होते. मी ते पुराव्या शिवाय बोललेलो नाही.(हातातला पेन ड्राईव्ह दाखवत) पेन ड्राईव्ह मध्ये सर्व पुरावे आहेत", असं अनिल देशमुख म्हणाले आहेत. शिवाय श्याम मानव यांनी केलेला दावा खरा असल्याचेही देशमुख यांनी म्हटलंय.
माझ्याकडे जे पुरावे आहेत ते योग्य वेळ आल्यावर मी समोर आणेल
शिवाय देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे काही क्लिप्स असल्याचा दावा केला. माझं त्यांना आव्हान आहे, त्यांनी ते क्लिपिंग जनतेसमोर आणावे. मला माहित आहे त्यांच्याकडे कुठलीही क्लिप्स नाही. त्यामुळे मी दावा करतो की त्यांनी त्या क्लिपिंग समोर आणाव्यात. माझ्याकडे जे पुरावे आहेत ते योग्य वेळ आल्यावर मी समोर आणेल, असं चॅलेंज अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे.
तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या अतिशय जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. त्या माणसाने माझं देवेंद्र फडणवीसांशी बोलणं करुन दिलं. अनेकदा त्याने बोलण करुन दिलं. त्यांनी चार मुद्यांचं अफिडेविट करुन द्या असंही सांगितलं होतं. मी तसं केलं असतं तर उद्धव ठाकरे, अजित पवार आणि आदित्य ठाकरे अडचणीत आले असते. मी त्यांना सांगितलं की, अनिल देशमुख कोणावरही खोटे आरोप करणार नाही, असंही अनिल देशमुख यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या

















