एक्स्प्लोर

Amravati Loksabha: मोठी बातमी: आनंदराज आंबेडकर अमरावती लोकसभा मतदारसंघातून रिंगणात; नवनीत राणांना कडवी टक्कर?

Maharashtra Politics: अमरावती लोकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत हायव्होल्टेज लढत असणारा मतदारसंघ ठरणार आहे. भाजपकडून नवनीत राणा रिंगणात उतरल्या आहेत. तर बच्चू कडू यांनीही राणांविरोधात आपल्या प्रहार संघटनेचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे.

अमरावती: नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वादामुळे सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघ प्रचंड चर्चेत आहे. भाजपने दोन दिवसांपूर्वीच अमरावतीमधून नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यानंतर नवनीत राणा (Navneet Rana) यांनी रितसर भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपच्या या निर्णयामुळे नाराज झालेल्या बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्यावतीने दिनेश बुब यांना अमरावतीच्या मैदानातून रिंगणात उतरवण्याची घोषणा केली होती. तसेच याठिकाणी वंचित बहुजन आघाडीने (VBA) अगोदरच उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे अमरावतीची लोकसभा मतदारसंघाची (Amravati Loksabha) लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. अशातच आता आणखी एका बड्या नेत्याने अमरावती लोकसभेच्या रिंगणात उडी घेतली आहे. रिपब्लिकन सेनेचे सर्वेसर्वा आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी शनिवारी अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले की, अमरावतीमधील सामान्य जनता, वेगळा विदर्भ संघटना आणि स्थानिक जनतेने आमच्या मतदारसंघात नवी चेहरा वेगळा विचार घेऊन येऊ शकतो, असे मला सांगितले. त्यासाठी मला तिकडच्या अनेक लोकांनी फोन केले. त्यांनी मला लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याची विनंती केली. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मी अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. 2 मे रोजी मी अमरावतीमधून लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरणार असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

वंचितच्या कार्यकर्त्यांनीच मला अमरावतीमधून लढण्याचा आग्रह केला: आनंदराज आंबेडकर

अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवाण यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे आता आनंदराज आंबेडकर मैदानात उतरल्यास आंबेडकरी मतांची विभागणी होऊ शकते, अशी चर्चा आहे. याविषयी विचारले असता आनंदराज आंबेडकर यांनी ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली. मला वंचितच्या कार्यकर्त्यांनीच अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची विनंती केली. प्रकाश आंबेडकरांकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवाराबाबत वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. आंबेडकर या नावाला वलय आहे. त्यामुळे आंबेडकर जेव्हा निवडणुकीला उभे राहतात तेव्हा समाज त्यांच्या पाठिशी असतो. आंबेडकर कोणत्याही पक्षातर्फे उभे राहिले तरी फरक पडत नाही, असे आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले.

आणखी वाचा

ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PMAnandache Paan : माणूस 'असा' का वागतो? पुस्तकाच्या लेखिका Anjali Chipalkatti यांच्यासोबत खास गप्पाBhaskar Jadhav On Nana Patole :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Embed widget