एक्स्प्लोर

Anandraj Ambedkar : अमरावतीमध्ये ट्विस्ट, माघार घेतलेले आनंदराज आंबेडकर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, वंचितवरही बोलले

Amravati Lok Sabha Election : आनंदराज आंबेडकरांनी आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. आता पुन्हा एकदा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. 

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या (Amravati Lok Sabha Constituency) निवडणुकीत पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आल्याचं दिसतंय. रिपब्लिन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी दोनच दिवसांपूर्वी अमरावतीतून निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केली होती. आता त्यांनी ही घोषणा माघार घेऊन पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला. तसेच वंचितने दिलेला पाठिंबाही त्यांनी स्वीकारला आहे. आनंदराज आंबेडकरांच्या या निर्णयामुळे अमरावतीच्या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होणार आहे. 

कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे निवडणूक लढवतोय

आपण माघारीचा निर्णय पुन्हा मागे घेत असल्याचं सांगत आनंदराज आंबेडकर म्हणाले की,  मी दोन दिवसांपूर्वी निवडणूक लढणार नाही असं सांगून माघार घेतली होती. पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी निवडणूक लढवत आहे. आंबेडकरी उमेदवार नसल्याने लोकांसमोर मतदान कोणाला करायचं असा प्रश्न होता. म्हणून मी उमेदवारी कायम ठेवत आहे. मी जाहीर करतो की मी ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे. तसेच वंचितने मला पाठिंबा दिला असून तो मला मान्य आहे.

मी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर लोकांनी असंतोष व्यक्त केला, काही जणांनी तर आत्मदहनाचा इशारा दिला. त्याचमुळे लोकांच्या आग्रहास्तव आपण ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं असल्याचं आनंदराज आंबेडकर म्हणाले. इंदू मिलचं काम माझ्यामुळे सुरू झालं आहे, त्यामुळे माझं काम किती आहे ते मला सांगायची गरज नसल्याचं आनंदराज आंबेडकर म्हणाले. 

आदिवासींसाठी पेसा कायद्याची अंमलबजावणी करणार

आनंदराज आंबेडकर म्हणाले की, संविधान आणि लोकशाही तोडण्याच काम सध्या सुरू आहे. तसंच कोणीतरी बोलणारा उमेदवार लोकसभेत जावा म्हणून मी निवडणूक रिंगणात उतरलो आहे. मूळ निवासी आदिवासी बांधवांसोबत जो अन्याय होत आहे, तो मला दूर करायचा आहे. आज अमरावतीमध्ये महिला खासदार असूनही याठिकाणी मेळघाटात महिलेची रस्त्यावर प्रसूती होतेय हे दुर्दैव. मेळघाटात पेसा कायदाची अंमलबजावणीसाठी मी प्रयत्न करणार. 

संविधानचं खरे रक्षक आम्ही आंबेडकरवादीच आहोत, आंबेडकर प्रेमी एक झाले म्हणून माझी उमेदवारी कायम ठेवली असंही आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं. 

आनंदराज आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असून ते रिपब्लिकन सेना या पक्षाचे प्रमुखदेखील आहेत. अमरावतीमधून ते निवडणूक लढवणार असल्याने त्यांच्यासमोर आता भाजपच्या नवनीत राणा आणि प्रहारचे दिनेश बुब हे उमेदवार असतील. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?Rajkiya Shole on BJP Shivsena : ठाकरे खरंच भाजपशी जवळीकीचा प्रयत्न करतायत? Special ReportRajkiya Shole on MVA Spilt : मविआतील फुटीच्या चर्चेवरुन काय म्हणाले संजय राऊत? Special ReportEknath Shinde Car Ride : एकनाथ शिंदेंच्या हाती 50 वर्ष जुन्या विंटेज कारचं स्टेअरिंग Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Embed widget