Amol Mitkari: महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींचा शिवसेनेला इशारा
Amol Mitkari: प्रत्येक पक्षात हवसे-नवसे-गवसे कार्यकर्ते असतात, त्यातलाच हा देखील नवसा कार्यकर्ता असेल. प्रकाश झोतात राहायचं होतं, म्हणून दादांनी आम्हाला वेळ दिला नाही हे कारण पुढे करत काळा कपडा टाकलं.
Amol Mitkari: अकोला : महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (Shivsena) पक्षातील शीतयुद्ध सातत्याने पुढे येत आहे. कधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरुन दोन्ही पक्षातील मतभेद चव्हाट्यावर येतात. तर, कधी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून त्यांच्या नेत्यांचे फोटो न वापरल्यावरुन कार्यकर्ते एकमेकांसमोर येतात. आता, बारामतीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा (Ajit pawar) फोटो काळ्या कपड्याने झाकल्याने महायुतीत पुन्हा एकदा खटका उडाला आहे. या घटनेवर आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) टिका केलीय. तर अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी दोन्ही पक्षांना टोला लावला आहे. हवसे, गवसे, नवसे कार्यकर्ते असतात, त्यातलाच हा देखील नवसा कार्यकर्ता असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय.
प्रत्येक पक्षात हवसे-नवसे-गवसे कार्यकर्ते असतात, त्यातलाच हा देखील नवसा कार्यकर्ता असेल. प्रकाश झोतात राहायचं होतं, म्हणून दादांनी आम्हाला वेळ दिला नाही हे कारण पुढे करत काळा कपडा टाकल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने बारामतीमध्ये गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या कमानी बारामती शहरात विविध ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. त्यात, एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. बारामती शिवसेनेच्यावतीने आयोजित एकनाथ महोत्सवाच्या उद्घाटनाला अजित पवार न आल्याने शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटो वरती काळं कापड टाकल्याने पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे, बारामतीमधील हा प्रकार राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. आता, त्यावर, आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे, महायुतीत पुन्हा एकदा शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने आले आहेत.
शिंदे गट बदनाम झालाय
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना वेळ भेटला नसेलय. काळा कपडा टाकून ठेवला म्हणजे बारामतीचा विकास झाकला असं नाहीय. दरम्यान, काळा कपडा टाकून सूर्याला झाकण्यासारखं हा प्रकार असल्याचंही मिटकरी यांनी म्हटलंय. तसेच, काळे झेंडे दाखवणारे आणि आजचा हा प्रकार करणारे हौसे कार्यकर्ते, त्यांच्या वागण्याने त्यांच्याच पक्षाची प्रतिमा मलिन होते. आजच्या प्रकारामुळे शिंदे गट बदनाम झालाय, तिन्ही पक्षात एकवाक्यता असल्याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीत यश प्राप्त होऊ शकणार नाही. त्यामुळं वरिष्ठांनी अशांना सक्त तंबी दिली पाहिजे, असेही मिटकरी यांनी म्हटले. आमच्याही भावना आहेत, भावनांचा उद्रेक झाल्यास मोठा विध्वंस होणार, असा इशाराही मिटकरी यांनी शिवसेनेला दिलाय.
काय आहे प्रकरण
सुरेंद्र जेवरे हे शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. अजित पवारांना तीन ते चार वेळा कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली परंतु अजित पवारांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली. अजित पवारांच्या कुटुंबाला देखील बोलावलं होतं, परंतु अजित पवारांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणपती मंडळांना भेटी दिल्या, पण एकनाथ फेस्टिवलला आले नसल्याने अजित पवारांच्या फोटोवर शिवसेनेकडून काळ कापड टाकण्यात आलं. तसेच, अजित पवारांचा निषेध केला, त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतले होते.
हेही वाचा
ठाकरेंना दे धक्का! मराठवाड्यातील माजी आमदार साथ सोडणार; विधानसभेपूर्वीच घेतला निर्णय