Amol Mitkari on Jitendra Awhad : तुम्ही तर प्रतिभाकाकीच्या कुंकवापर्यंत आलात, अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काकाच्या मृत्यूची वाट बघताय का? शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता, जनता तुम्हाला तुमची औकात दाखवेल,असा हल्लाबोल अजित पवारांवर केला होता. त्याला आता अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या शेवटच्या निवडणुकीच्या (Last Election) भावनिक सादावर केलेल्या भाष्यावरुन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात टोकाचा वाद उफाळला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काकाच्या मृत्यूची वाट बघताय का? शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता, जनता तुम्हाला तुमची औकात दाखवेल,असा हल्लाबोल अजित पवारांवर केला होता. त्याला आता अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तुम्ही तर प्रतिभाकाकींच्या कुंकवालाच हात घातला, असं मिटकरी म्हणाले. ते अकोल्यात बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असल्यापासूनच पक्षातील एक गट नेहमीच अजितदादांना त्रास देत होता. या गटाचं नेतृत्व आधीपासूनच डॉ. जितेंद्र आव्हाड करीत होते. काल बारामतीतील अजितदादांच्या वक्तव्याचा विपर्यास करीत आव्हाड यांनी हा विषय थेट प्रतिभाकाकीच्या कुंकवापर्यंत आणला असा घणाघात अमोल मिटकरींनी. आव्हाडांच्या या कृतीला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.
अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले? (Amol Mitkari on Jitendra Awhad)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना आदरणीय अजितदादांविरुद्ध एक सुप्त टोळी तेव्हापासून काम करत होती. आमच्या अनेक गोष्टी लक्षात आल्या. पण वरिष्ठांसमोर आम्ही बोलण्याची हिंमत केली नाही. त्या टोळ्यांमधला एक टोळकं म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जे वारंवार प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करतात. काल बारामती येथे असताना अजितदादांनी जे भाषण केलं त्या भाषणाचा वेगळा अर्थ काढून थेट प्रतिभा काकीच्या कुंकावासोबत त्यांनी ते विधान जोडण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की या टोळक्याचा जो म्होरक्या आहे आणि त्या म्होरक्याच्या अधिपत्याखाली काम करणारी सूप्त टोळी आहे, ती आव्हाडांच्या माध्यमातून उफाळून आली.
बारामतीकर फार हुशार आहेत आव्हाडांनी स्वतःच्या मतदारसंघाची काळजी करावी. अजितदादांच्या विधानाचा विपर्यास करून, पवार साहेबांच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करून, प्रतिभा काकीचा कुंकू काढणाऱ्या जितेंद्र आव्हाडला महाराष्ट्रात कोणीही माफ करू शकणार नाही. आव्हाडांचा मी निषेध व्यक्त करतो. जो व्यक्ती रामाबद्दल अपशब्द वापरू शकतो, जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक अधिकाराबद्दल बोलू शकतो, ती व्यक्ती अजितदादांबद्दल चांगले बोलू शकेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. दादांवर बोलले असते तर एक वेळ मी मान्य केलं असतं, पण ज्या पवार साहेबांच्या ताटात खाता, ज्यांच्या डाळ दाण्यावर जगता, त्यांचांच कुंकू जर काढून त्यांच्या मरणाची वाट पाहत असाल तर जितेंद्र आव्हाड तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते? (Jitendra Awhad statement on Ajit Pawar)
लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते, तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता असल घाणेरडं राजकारण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही. एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं कितपत योग्य आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतोय . शरद पवार अजरामर राहतील, त्यांचं योगदान अजरामर राहतील. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली. भावनिक आवाहन तुम्ही करता येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले होते? (Ajit Pawar statement on Sharad Pawar)
येत्या निवडणुकीत वरिष्ठांकडून शेवटची निवडणूक आहे असे सांगितले जाऊन भावनिक आवाहन केलं जाईल. कधी शेवटची असणार आहे काय माहित, असं अजित पवार बारामतीतील कार्यक्रमात म्हणाले. इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले आता माझं ऐका. उद्या आपल्या विचाराचा खासदार दिला तर मी मोदींना सांगेल की माझ्या लोकांनी खासदार दिला आहे आता माझी कामे झाले पाहिजेत. आपल्या अडीला कोण उपयोगी करतो याचा विचार करा, असं अजित पवारांनी सांगितलं.
Amol Mitkari on Jitendra Awhad : अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?
संबंधित बातम्या