चुलत्याच्या मरणाची वाट पाहतोय, अजित पवारांनी हद्द केली, लाज वाटते तुमच्यासोबत काम केल्याची; जितेंद्र आव्हाडांचा घणाघाती प्रहार
शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता, जनता तुम्हाला तुमची औकात दाखवेल, असा घणाघात आव्हाडांनी अजित पवारांवर केला आहे.
मुंबई : शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल', कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत...? असे म्हणत बारामतीत अजित पवारांनी भावनिक आवाहनाला बळी न पडण्याचा सल्ला दिला. अजित पवारांच्या (Ajit Pawar) या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) अजित पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतोय. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता, जनता तुम्हाला तुमची औकात दाखवेल, असा घणाघात आव्हाडांनी अजित पवारांवर केला आहे.
काकाच्या मृत्यूची वाट बघतोय : जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड म्हणाले, एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करण कितपत योग्य आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतोय . शरद पवार अजरामर राहतील, त्यांचं योगदान अजरामर राहतील. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली. भावनिक आवाहन तुम्ही करता येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील.
काकूचे कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघतोय : जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड म्हणाले, आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग हे देखील नावं काढतात. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता असल घाणेरडं राजकारण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही.
अजित पवार महाराष्ट्राचा नेता म्हणून लाज वाटते: जितेंद्र आव्हाड
शरद पवार यांचे प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे आहेत. तुमचा एक निर्णय दाखवा. अजित पवार यांनी त्यांचं दिल्लीतल एक भाषण दाखवावं. साहेबांची खरी चूक आहे साहेबांनी अजित पवारला कधी ओळखलं नाही. राज्य उत्पादन मागितलं ते दिल फक्त पैसे खाण्यासाठी. शेवटच्या निवडणुकीची वेळ तुमच्यावर पण येणार आहे. अजित पवार हा महाराष्ट्राचा नेता म्हणून लाज वाटते. शरद पवार यांच्या मृत्यूची वाट बघणारा कलंकित अजित पवार महाराष्ट्राला आणि बारामतीकरांना कधीच आवडणार नाही, असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यात रात्री बॉम्ब असल्याचा एक निनावी फोन आला त्याविषयी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये फोन आला होता की घरी बॉम्ब ठेवला आहे. त्यामुळे घरी पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक आलं होत त्यांना काही सापडलं नाही. भुजबळ दोन समाजामध्ये का वाद निर्माण करताय? महाराष्ट्राची लाज काढताय, महाराष्ट्र जाळायचं आहे का पूर्ण. गरीब समाजाला फसवत आहात. भुजबळ खोटं बोलतात राजीनामा दिला ना मग सुविधा कसल्या घेता.
हे ही वाचा :