(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Deshmukh : "अजित पवारांचे वक्तव्य भयानक, महाराष्ट्रातील जनतेला आवडणार नाही"; अनिल देशमुखांनी सुनावले खडेबोल
Anil Deshmukh : अजित पवारांनी केलेले वक्तव्य भयानक आहे. त्यांचे वक्तव्य महाराष्ट्रातील जनतेला आवडणार नाही, अशी टीका अनिल देशमुख यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.
Anil Deshmukh : 'शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल', कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत? असे म्हणत बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) भावनिक आवाहनाला बळी न पडण्याचा सल्ला देऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न घेता टीका केली. यावरून शरद पवार गटाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
अनिल देशमुख म्हणाले की, अजित पवार यांचे वक्तव्य भयानक आहे. जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) वक्तव्याचे मी समर्थन करतो. ज्यांनी समाजात स्थान दिले, त्यांच्याबद्दल असे बोलणे अयोग्य आहे. राजकारणासाठी खालच्या स्तरावर जाणे हे महाराष्ट्रातील जनतेला आवडणार नाही. ते वडिलांसारखे आहेत. ज्यांनी तुम्हाला राजकारणात स्थान निर्माण करून दिले आहे त्यांच्यावर असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याची टीका त्यांनी केली आहे.
पोलीस स्टेशनला जाऊन गोळीबार करणे हे पोषक वातावरण नाही
उल्हासनगर (Ulhasnagar) गोळीबार प्रकरणावर अनिल देशमुख म्हणाले की, सत्ताधारी पक्षात गँगवार सुरू आहे. महाराष्ट्राने गुंडशाही राज्य कधीही पाहिलं नव्हतं. सत्ताधारी आपापसात भांडत आहेत. यावर कोणाचे अंकुश आहे की नाही. कायदा सुव्यवस्था बिघडवला आहे. पोलीस स्टेशनला जाऊन गोळीबार करणे हे पोषक वातावरण नाही. यावर सत्ताधाऱ्यांनी गंभीरपणे विचार करावा.
आरक्षण कमी होण्याची भीती ओबीसी समाजात
ओबीसी समाजावर अनिल देशमुख म्हणाले की, ओबीसी (OBC) समाजावर अन्याय होणार नाही, त्यांच्या आरक्षणावर गदा येऊ नये, अशी भावना ओबीसी समाजातील जातीमध्ये आहे. आरक्षण कमी होणार अशी भीती ओबीसी समाजात आहे. या भीतीपोटी राज्य सरकारने विचार करावा, असेही त्यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करण कितपत योग्य आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतोय. शरद पवार (Sharad Pawar) अजरामर राहतील, त्यांचे योगदान अजरामर राहतील. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली. भावनिक आवाहन तुम्ही करता येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील.
आणखी वाचा