(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमोल मिटकरींची शिवा मोहोडांविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार, व्हिडीओ व्हायरल करीत असल्याचा आरोप
Amol Mitkari: आमदार अमोल मिटकरी आणि अकोल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. आमदार मिटकरी आणि शिवा मोहोड यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फेरीनंतर आता हे प्रकरण थेट सायबर पोलिसांत गेलं आहे.
Amol Mitkari: आमदार अमोल मिटकरी आणि अकोल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. आमदार मिटकरी आणि शिवा मोहोड यांच्यातील आरोप प्रत्यारोपांच्या फेरीनंतर आता हे प्रकरण थेट सायबर पोलिसांत गेलं आहे. आमदार मिटकरी यांनी शिवा मोहोड यांच्याविरोधात सायबर सेल पोलिसांकडे तक्रार केली आहे. शिवा मोहोड आपले व्हिडीओ व्हायरल करीत असल्याचं या तक्रारीत नमूद करण्यात आलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मोहोड यांना अकोला सायबर पोलिसांनी मंगळवारी पोलिसांसमोर हजर होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांच्याविरोधातील पुरावे उघड करण्यावर शिवा मोहोड यांनी ठाम असल्याचं म्हटलं आहे. मात्र मोहोडांची पुरावे 10 दिवसात सादर करण्याची मुदत कालच संपली आहे.
आमदार अमोल मिटकरी-शिवा मोहोड यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी
अकोल्यात राष्ट्रवादी पक्षात पदाधिकारी आणि आमदाराकडून एकमेकांवर गंभीर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राष्ट्रवादीचे शिवा मोहोड यांनी थेट मिटकरी हे कामासाठी कमिशन घेत असल्याचा आरोप केला होता. यासोबतच मिटकरींना थेट त्या महिला पदाधिकाऱ्याचं काय प्रकरण आहे? असा सवाल उपस्थित करण्यात आला. तर मिटकरींनी आरोप फेटाळत शिवा मोहोडांना सूचक इशारा दिला होता. सध्या राज्यभरात हा विषय चांगलाच रंगला आहे. दरम्यान, आता मिटकरी आणि मोहोड यांच्यातील वाद नवीन वळणावर आला होता. आता आमदार मिटकरींनी थेट अकोल्याच्या सायबर सेलला आपले व्हिडीओ वायरल केल्या प्रकरणी आणि इतर व्हिडrओ वायरल होण्याची शक्यता लक्षात घेत अकोला सायबर पोलिसांत तक्रार दिली आहे.
सायबर पोलिसांचे शिवा मोहोड यांना 'हाजिर हो'चे आदेश
या तक्रारीनंतर सायबर सेलचे प्रमुख राहुल वाघ यांनी शिवा मोहोड यांना फोनवरुन सायबर सेल येथे हजर होण्याच्या सुचना दिल्या आहेत. यातच नेमके कोणत्या व्हिडीओ बद्दल आपण बोलताय, असे मोहोड यांनी पोलिसांना विचारले असता त्यांनी आपण हजर व्हावे, सांगतोय असे म्हटले आहे. अशी माहीती शिवा मोहोड यांनी 'एबीपी माझा'शी' बोलतांना दिली. दरम्यान, आता मोहोड मंगळवारी सायबर सेलला हजर होणार आहेत. आमदार मिटकरी संदर्भात कोणते व्हिडीओ व्हायरल झाले, अन् कोणते व्हिडीओ व्हायरल होणार आहे, हे मंगळवारीचं स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पोलिसांना या संदर्भात विचारले असता त्यांनी आपल्याकडे तक्रार आलेली आहे, चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे.