एक्स्प्लोर

Amit Shah : अमित शाह आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, मुंबईंत मुक्काम; महायुतीच्या जागावाटपावर होणार चर्चा

Amit Shah Visit Maharashtra : अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केल्यावर शाह हे मुंबईला (Mumbai) मुक्काम करणार आहेत.

Amit Shah Visit Maharashtra : भाजपचे राष्ट्रीय नेते तथा गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर असून, सोमवारी रात्री उशिरा ते छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) दाखल झाले आहेत. राजकीयदृष्ट्या अमित शाह यांचा हा दौरा महत्वाचा समजला जात असून, त्यांच्या याच दौऱ्यात महायुतीच्या (Mahayuti) जागावाटपावर चर्चा होणार आहे. अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा केल्यावर शाह हे मुंबईला (Mumbai) मुक्काम करणार आहेत. त्यामुळे मुंबईत आज महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

भाजपकडून लोकसभा उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्रातील महायुतीत अजूनही जागावाटपावर कोणताही निर्णय होऊ न शकल्याने, महाराष्ट्राला उमेदवारांच्या नावाच्या पहिली यादीतून वगळण्यात आले आहे. काही जागांवर भाजपसह महायुतीमधील इतर पक्षांनी देखील दावा केला आहे. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय होऊ शकला नाही. दरम्यान, अमित शाह महराष्ट्राच्या दौऱ्यावर असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून अमित शाह हे महायुतीमधील जागावाटपाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतील अशी चर्चा आहे. 

तीन जिल्ह्याचा दौरा...

विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह मंगळवारी अकोल्यात भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. दुपारी 1 वाजता बैठक आटोपून ते जळगावच्या सभेसाठी रवाना होतील. जळगाव येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. जळगावची सभा झाल्यावर शाह हे सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची दुसरी सभा होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आगमन व स्वागत

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. सुभाष भामरे,गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,आ. प्रशांत बंब तसेच विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त 

अमित शाह यांच्या संभाजीनगरच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. ज्यात सभेसाठी 200 अधिकारी आणि 1500 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. चौकाचौकांत पोलिसांचा फौजफाटा तैनात असेल. यात पोलिस उपायुक्त 6, सहायक पोलिस आयुक्त 11, पोलिस निरीक्षक 44, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक 128, पुरुष पोलिस हवालदार 1270, महिला पोलिस हवालदार 130, तर एक एसआरपीएफची कंपनी तैनात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Amol Kolhe Reply to Ajit Pawar : डॉक्टर, वकील खासदार होऊ शकतात, मग हा कलावंत यांच्या घशात का अडकतो? 'लक्ष्या'च्या डायलॉगमध्ये अमोल कोल्हेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget