Amit Shah on Harshvardhan Patil : जेव्हा पण मला हर्षवर्धन भेटतो, तेव्हा माझा गळा पकडतो आणि म्हणतो आमचा इथेनॉल घ्या; अमित शाहांकडून हर्षवर्धन पाटलांचे कौतुक
Amit Shah on Harshvardhan Patil : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि शेतकरी नेते पाशा पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.
![Amit Shah on Harshvardhan Patil : जेव्हा पण मला हर्षवर्धन भेटतो, तेव्हा माझा गळा पकडतो आणि म्हणतो आमचा इथेनॉल घ्या; अमित शाहांकडून हर्षवर्धन पाटलांचे कौतुक Amit Shah on Harshvardhan Patil Whenever I meet Harshvardhan he grabs my throat and says take our ethanol says by Amit Shah Marathi News Amit Shah on Harshvardhan Patil : जेव्हा पण मला हर्षवर्धन भेटतो, तेव्हा माझा गळा पकडतो आणि म्हणतो आमचा इथेनॉल घ्या; अमित शाहांकडून हर्षवर्धन पाटलांचे कौतुक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/10/45a94a1686c4bc24cf4d994f031e59311723288300896924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amit Shah on Harshvardhan Patil : देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि शेतकरी नेते पाशा पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. "हर्षवर्धन तुमच्या सगळ्यांचे अध्यक्ष आता तुमचे वकील झाले आहेत. जेव्हा पण मला हर्षवर्धन भेटतो तेव्हा माझा गळा पकडतो आणि म्हणतो आमचा इथेनॉल घ्या. तुम्ही फक्त दोन वर्ष धीर धरा, मोदी एक प्लेटफॉर्म विकसित करत आहेत. तुम्ही जितका इथेनॉल तयार कराल तो सगळा विकत घेतला जाईल", असं अमित शाह म्हणाले आहेत. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या कार्यक्रमाला दिल्लीतील आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यावेळी ते बोलत होते. गृहमंत्री अमित शाह तसेच साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
अमित शाह म्हणाले, इथेनॉल मका, बांबू, तांदूळ पासून इथेनॉल बनला पाहिजे. समोर पाशा पटेल बसले आहेत, चष्मा पण बांबूचा घालतात. महाराष्ट्रवाले बहुत डिमांड करते हैं, विचारलं की पैसे कुठून मिळणार? तुम्हाला जितका निधी पाहिजे तितका तुम्हाला मिळेल, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.
अमित शाह भाषण पॉईंटर्स
तुम्हाला सर्वांना भेटून मनात प्रसन्नता
आपला देश सहकार चळवळीचा साक्षी
सहकार कायद्यात येण्यापूर्वी पासून देशात सहकारचा भाव होता
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांना सहाकारितेचा पाया रचला
देश स्वतंत्र झाल्यावर आवश्यक गोष्टी झाली नाहीत
त्यामुळे सहकार काही राज्यांपुरता मर्यादीत राहिला
देशभरात एक मागणी होती की सहकार मंत्रालय असाव
परंतु सहकार राज्य सरकारांचा भरवशावर सोडला
राज्य सरकारांनी चांगलं काम केलं
अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जायचं असतं तेव्हा सहकार विषयी राष्ट्रीय धोरण असणे गरजेचे होते
मी एक सहकार चळवळीतील कार्यकर्ता म्हणून मोदींना मनापासून धन्यवाद
मला पहिला सहकार मंत्री होता आलं याबद्दल आभारी आहे
सर्व सहकारी कारखान्यांचे अभिनंदन
दहा वर्षात देशातील सर्व क्षेत्रात प्रगती झाली आहे.
- सर्व साखर कारखाने इथेनॉल बनवणारे असले पाहीजे
- साखर कारखान्यांकडे जमीन आहे
- वीज कनेक्शन आहे
- तर जोडधंद्याचा विचार केला पाहीज
- संशोधन युनिट सुरु केले पाहिजे
इतर महत्वाच्या बातम्या
Manoj Jarange Patil : कानात कामाला असाल तर एक दिवसकामाला सुट्टी द्या,शिक्षकांनी सुट्टी काढून या; मनोज जरागेंचे आवाहन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)