EXCLUSIVE : मुला-मुलीच्या मोहात शिवसेना-राष्ट्रवादी फुटली, अमित शाहांची उद्धव ठाकरे-शरद पवारांवर बोचरी टीका, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळेंचाही उल्लेख
Amit Shah On ABP : एबीपीला दिलेल्या एक्सक्युझिव्ह मुलाखतीत अमित शाह यांनी ही टीका केली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात विजयाचा विश्वासही व्यक्त केला आहे.
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्रात विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. आम्ही कोणताही पक्ष फोडलेला नाही, उद्धव ठाकरे यांनी मुलाच्या मोहात आणि शरद पवार यांनी मुलीच्या मोहापायी आपला पक्ष फोडला आहे, असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं आहे. एबीपीला दिलेल्या एक्सक्युझिव्ह मुलाखतीत अमित शाह यांनी ही टीका केली आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात विजयाचा विश्वासही व्यक्त केला आहे.
उद्धव ठाकरेंनी मोदींच्या नावाने मतं मागितली
गेल्या लोकसभा निवडणुकीत जनतेने मोदींना निवडलं आहे. 2019 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मोदींच्या नावाने मतं मागितली. उद्धव ठाकरेंना जी मतं मिळाली, तीही मोदींमुळे मिळाली. मतदार तोच आहे, भाजपसोबत आहे, एनडीएसोबत आहे. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौरा केला आहे, महाराष्ट्रात आम्हाला एक-दोन जागा कमी-जास्त होऊ शकतात, पण संपूर्ण महाराष्ट्रात मोदींसोबत आहे.
अमित शाहांची उद्धव ठाकरे-शरद पवारांवर
आम्ही कोणताही पक्ष तोडला हा आरोप चुकीचा आहे. शरद पवारांनी मुलगी सुप्रिया सुळे यांना पक्षाच्या अध्यक्षा बनवण्याच्या मोहामध्ये पक्ष फोडला आणि उद्धव ठाकरे यांनी मुलगा आदित्य ठाकरे यांना मु्ख्यमंत्री करण्याच्या मोहात पक्ष तोडला. त्यांचे पक्ष स्वत: फुटली आहे. त्यांच्यासोबत जे मतदार होते, ते मोदींचे मतदार आहेत, ते मोदींनाच मत देतील, असा विश्वासही यावेळी अमित शाहांनी व्यक्त केला आहे.
4 जूनला सर्व समोर येईल
जनता भावनिकदृष्ट्या उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत आहे असं काही लोक म्हणत आहेत, या प्रश्नावर उत्तर देताना अमित शाह म्हणाले की, एका छोट्याशा खोलीमध्ये यावर वाद घालण्यात अर्थ नाही. मी माझा अंदाज वर्तवला आहे. तुम्हाला 4 जूनला जनता उत्तर देईन, आम्ही 400 पारचा आकडा पार करु एवढं मात्र नक्की आहे, असं अमित शाहांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :