भाजप उन्माद हत्तीसारखं वागतोय, हा उन्मादपणा संपवायचाय; शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यातून दानवेंचा हल्लाबोल
शिवसेनेची ताकद आपल्यालाच माहित नाही, मुंबईत आपलं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला. आंदोलन का दाबलं जातं, जेंव्हा त्याचा भडका उडणार असतो

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचा आज नाशिकमध्ये निर्धार मेळावा होत असून राज्यातील शिवसैनिकांना (Shivsena) ऊर्जा देण्याचा प्रयत्न या शिबीराच्या माध्यमातून होत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येथील मेळाव्यातून शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांनी नाशिकमधील मेळाव्यातून भाजपवर तोफ डागली. मेळाव्याच्या माध्यमातून संघटनेचा आत्मा आणि पुनर्बांधणी होत आहे. शिवसेना प्रमुख शरीर रूपाने आपल्यामध्ये नसतील पण त्यांचा विचार आपल्या रोमरोममध्ये रुजलेला आहे, असे दानवे यांनी म्हटले. तसेच, भाजप (BJP) हा उन्मात हत्तीसारखा वागत आहे, तो उन्मादपणा आपल्याला संपवायचा आहे, अशी टीका दानवे यांनी भाजप नेत्यांवर केली.
शिवसेनेची ताकद आपल्यालाच माहित नाही, मुंबईत आपलं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला. आंदोलन का दाबलं जातं, जेंव्हा त्याचा भडका उडणार असतो. भाजप उन्मात हत्तीसारखं वागत आहे, आपल्याला हा उन्मातपणा खत्म केला पाहिजे, असे म्हणत अंबादास दानवे यांनी भाजपवर हल्ल्बोल केला. आता, लबाडांनो पाणी द्या! हे आंदोलन आम्ही उद्यापासून एक महिना संभाजीनगरमध्ये करत आहोत, असेही दानवेंनी सांगितले.
8 जून रोजी मराठवाड्याचा शिबीर करणार आहोत, 8 जिल्ह्याचं मिळून हे शिवसेना पक्षाचं हे शिबीर असणार आहे. आपलं कसं होणार? शिंदेंचे लोक काय करताय, भाजपचे लोक बघा कसं करताय हे आपले लोकं म्हणत आहेत. सत्ता येईल आणि जाईल संघटनेचं काम त्यासाठी आपण करत नाहीत. आपल्याला पक्षाचा विचार रुजवायचा आहे, हे काम संघटनेचं आहे. राहुल गांधी यांना सुद्धा खुशवंत सिंह या पत्रकारने सांगितलं की, तुम्हाला संघटनेचं काम कसं असतं जाणून घ्यायचा असेल तर महाराष्ट्रमध्ये जा आणि शिवसेना पक्षप्रमुख यांचं काम बघा, असा किस्सा अंबादास दानवे यांनी यावेळी शिवसैनिकांना सांगितला.
जनतेमध्ये गेलं पाहिजे
काहीजण व्हाट्सअप आंदोलन करणारे आम्ही बघत आहोत, आपल्यला जबाबदाऱ्या ओळखता आल्या पाहिजे. गटप्रमुखांपासून सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. जनतेमध्ये आपण जात नाही, जनतेमध्ये जाणे गरजेचं आहे. स्वाभिमानाची भाकरी मला महत्वाची वाटते, आपल्यातून गेलेल्या लोकांचे हाल काय आहे? अनेकांचे फोन येतात. आपल्या पक्षाचे लोक विचारसरणी विषयी शंका निर्माण करतात.
चंद्रकांत खैरेंना टोला
वक्फ बिल संदर्भात आपण जी भूमिका घेतली ती नीट समजून घ्या. आपण काँग्रेस सोबत गेलो. कार्यपद्धती मध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आपले 40-50 आमदार जरी गेले असले तरी जाऊ द्या, मात्र संघर्ष करून आपण सत्तेत येऊ. काही काल बैठकीत सांगत होते 2 वर्षांपूर्वी आलेला माणूस आम्हाला आदेश देतो, आम्ही पक्षात 40 वर्षांपासून काम करतोय. पण, आता ही पक्षाची सिस्टम आहे, ती समजून घेतली पाहिजे, असे म्हणत नाव न घेता चंद्रकांत खैरेंना टोलाही लगावला.
शिवसेना ला हिंदुत्व सोडल हे आम्हाला दाखवून द्या, रेल्वे रिकामी जशी राहात नाही तशी शिवसेना कधीही रिकामी राहणार नाही. 4 लोक जातील तर 10 लोक येतील, शिवसेनचा पाया मजबूत आहे त्यामुळे कळस चढवता येतो. हिम्मत नसेल तर त्याला किंमत सुद्धा कोणी देत नाही, असेही दानवेंनी म्हटले.
हेही वाचा
राज ठाकरे अन् एकनाथ शिंदेंची भेट, स्नेहभोजन; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मी...
























