All India Panther Sena: पँथर सेनेकडून महाविकास आघाडीला जागा वाटपासाठी अल्टिमेटम; म्हणाले, दगा फटका झाला तर....
All India Panther Sena: आम्ही दिलेला प्रस्ताव तात्काळ मान्य केला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रात 50च्या वर जागा स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेने महाविकास आघाडीला दिला आहे.
VidhanSabha Election 2024 Beed: राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. अशातच महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) असलेल्या पँथर सेनेने महाविकास आघाडीकडे जागा वाटपाचा प्रस्ताव दिलाय. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला छोट्या घटकांना विसरून चालता येणार नाही. आंबेडकरी चळवळीतील नवा चेहरा म्हणून आम्ही लढतो आहोत. मात्र, आमच्याशी दगा फटका देण्याचं काम झालं तर याचा फटका महाविकास आघाडीला झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही दिलेला प्रस्ताव तात्काळ मान्य केला पाहिजे. अन्यथा पँथर सेना महाराष्ट्रात 50 च्या वर जागा स्वतंत्र लढण्याच्या तयारीत असल्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे (All India Panther Sena) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार (Deepak Kedar) यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.
मराठा आरक्षणाचे भिजते घोंगडं ठेवण्याचे षडयंत्र- दीपक केदार
दीपक केदार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते बीड (Beed) जिल्ह्याचा आढावा घेत आहेत. लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा परिणाम पाहायला मिळाला. आता विधानसभा निवडणुकीत देखील मराठा आरक्षणाचा शंभर टक्के परिणाम दिसून येणार आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपाने आरक्षणासंदर्भात कोणतीही भूमिका घेतली नाही. मराठा आरक्षणाचे भिजते घोंगडं ठेवण्याचे षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्याचा फटका या निवडणुकीत बसल्याशिवाय राहणार नसल्याचं दीपक केदार यांनी म्हटल आहे.
तुम्ही कोयता कधी हातात घेतला आहात का?
तर दसरा मेळाव्या दरम्यान पंकजा मुंडे यांनी कोयत्याला धार लावून ठेवा, असं विधान केले होते. यावर केदार यांनी भाष्य करत कोयत्याला धार लावण्याची भाषा दंगलीची भाषा आहे. तुम्ही कोयता कधी हातात घेतला आहात का? कोयता हातात घेणाऱ्याचे दुःख तुम्हाला माहित आहे का? असा सवाल उपस्थित करून कोयता मुक्त बीड जिल्हा कसा होईल हे पाहावं. असं आवाहन ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी पंकजा मुंडेंना केले आहे.
जातीपातीच्या राजकारणावरुन पंकजा मुंडे संतापल्या
मी साताऱ्याला गेले होते. तेव्हा उदयनराजे भोसले यांनी मला घरात नेलं आणि माझ्या हाताने आरती केली, तेव्हा त्यांच्या वडिलांच्या बाजूला गोपीनाथ मुंडेंचा फोटो होता. मात्र, आज राज्यात काय स्थिती आहे? अशी विचारणा पंकजा मुंडे यांनी केली. एखाद्याच्या गाडीचा अपघात झाला तर चालकाचे जात विचारली जाते. चिमुकलीवर अत्याचार झाल्यास त्याची जात विचार जात विचारली जाते. ही वेळ पाहण्यासाठी आयुष्यातील 22 वर्षे घालवली का? असा संतप्त सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला.
हे ही वाचा