Ajit Pawar : कुठं हार्ट काढत बसून नका, मी कॅमेरे बसवणार, कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो; बारामतीत अजित पवारांचा थेट इशारा
Ajit Pawar: मी काम करतोय पण काही लोक माझ्यासोबत नाही. काहींना मी नगराध्यक्ष केलं आणि ते आज माझ्या सोबत नाहीत, असे म्हणत शरद पवार गटातील दोन महिलांना अजित पवारांनी टोला लगावला.

Ajit Pawar: कुठं हार्ट काढत बसून नका, मी कॅमेरे बसवणार आहे. कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलाय. अजित पवारांच्या हस्ते बारामती (Baramati News) शहरातील सावतामाळी सभागृह भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अजित पवारांनी तुफान फटकेबाजी केली.
अजित पवार म्हणाले की, अंधकार दूर होऊन प्रकाश येवो, याच शुभेच्छा देतो. मधल्या काळात पावसाने हजेरी लावली. सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडला. 18 आणि 19 ला हवामान खात्याने पाऊस सांगितला आहे. मी विकास करतोय आणि काही लोक तिथं चोऱ्या करण्याचा प्रयत्न करतात. कुणाचं नुकसान झालं तर म्हणतील बघा कसा विकास चालला आहे? बोलायला कुणी हात धरू शकत नाही, असे त्यांनी म्हटले.
Ajit Pawar: मी काम करताना जात बघत नाही
जो चोरी पकडून देतील, त्याला 1 लाख रुपये देऊ आणि जो चोरी करेल त्याला दोन लाख दंड करु. पकडून देणाऱ्याला 1 लाख तर 1 लाख रुपये पालिकेला देऊ, असे देखील अजित पवारांनी स्पष्ट केले. मी काम करताना जात बघत नाही. काम करण्यासाठी वाळू आणली. त्यातली वाळू काहींनी चोरून नेली. ही जित्राबं बारामतीत कशी? याचा विचार करतोय, यांचा बंदोबस्त करतो, असा इशारा देखील त्यांनी दिला.
Ajit Pawar: कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो
काही जण नवरात्री आली की गोधड्या धुतात, आणि वाळायला टाकतात. मी जिथं सुशोभित केलं आहे त्यावर वाळायला टाकतात. दसऱ्याच्या दिवशी बारामतीत 2300 चार चाकी गाड्या विकल्या गेल्या. साहेब आमदार होते, तेव्हा 17 हजार मतदार होते. आता मतदार 1 लाख 10 हजार आहेत. एवढी बारामतीत लोक वाढली आहेत. कुठं हार्ट काढत बसून नका. आता मी कॅमेरे बसवणार आहे. कुणी गावले तर त्याला टायरमध्येच टाकतो, असा इशारा अजित पवारांनी दिलाय.
Ajit Pawar: तुझं खेळण्याचे वय गेलं आता तू...
रस्त्यावर सतरंजी टाकतात आणि विकायला बसू नका. एक बाई अंडी विकायला बसली. लहान मुलांच्या खेळण्यावर मोठी लोक बसतात. तुझं खेळण्याचे वय गेलं आता तू आता घोडा झालाय, असा मिश्कील टोला देखील अजित पवारांनी लगावला. मी काम करतोय पण काही लोक माझ्यासोबत नाही. काहींना मी नगराध्यक्ष केलं आणि ते आज माझ्या सोबत नाहीत, असे म्हणत शरद पवार गटातील दोन महिलांना अजित पवारांनी टोला लगावला.
Ajit Pawar: माझी आणि कागदाची कुठं गाठ पडली
आता पाच दिवस सुट्टी आहे. मला आता कागद द्यायचं बंद करा. माझी आणि कागदाची कुठं गाठ पडली, सारखं दादा धरा, दादा धरा... निवडणूक संपली की आचार संहिता लागेल. त्यामुळे मला राज्यभर फिरावं लागेल, असे देखील अजित पवारांनी म्हटले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
आणखी वाचा
























