Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंनी पहिल्याच भाषणात विरोधकांच्या दुखऱ्या नसेला हात घातला, देवेंद्र फडणवीसही हसायला लागले
Vidhan Sabha vishesh Adhiveshan: एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. सगळंच काढलं.
मुंबई: राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी केलेल्या भाषणावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच टोले लगावले. विरोधी पक्षाने सभागृहात सरकारच्या चांगल्या कामाला पाठिंबा द्यायचा असतो आणि चुकल्यावर कान धरायचाअसतो. पण यावेळी विरोधी पक्षाची अवस्था चिंताजनक आहे. त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदी जितके आमदार लागतात तितकेही नाहीत. हे चिंताजनक आहे. असं व्हायला नव्हतं पाहिजे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला लगावला. आता महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद द्यायचे की नाही, त्यावर विधानसभा अध्यक्ष अभ्यास करतील. तो त्यांचा अधिकार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात कोणावरही फारशी टीका न करता आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भाषा केली. मात्र, एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीवर ताशेरे ओढायला सुरुवात केली. पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाल्याबद्दल राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन. ते 'मी पुन्हा येईन',बोलले नव्हते, तरीही आले. देवेंद्र फडणवीस हे 'मी पुन्हा येईन' सांगून आले. मी एकदा सभागृहात म्हणालो होते की, आमचे 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, नाहीतर मी शेती करायला जाईन. तो शब्द आम्ही पूर्ण केला. अजितदादा आमच्यात आल्यामुळे बोनस मिळाला. त्यामुळे आता राज्यात विकास आणि प्रगतीचे नवीन पर्व सुरु झाले आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
राहुल नार्वेकर कोणावरही अन्याय करणार नाहीत: एकनाथ शिंदे
राहुल नार्वेकर यांच्यावर पुन्हा अध्यक्षपदाची जबाबदारी आली आहे. गेल्यावेळी नाना पटोले, त्यांना डाव्या बाजूची जास्त काळजी घ्या, असे म्हणाले होते. पण जनतेनेच डाव्या बाजूची जास्त काळजी घेतली आहे. आता विधानसभा अध्यक्ष डाव्या बाजूला अधिक लक्ष देतील, सूक्ष्मपणे बघतील. ते कोणावरही अन्याय करणार नाही, याची खात्री बाळगा, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या भाषणातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे
* नाना पटोले याच मी आभार मानतो की नार्वेकर यांच्यासाठी त्यानी अध्यक्ष पद रिक्त केलं
* खरं आहे ते बोललं पाहिजे
* मुळं आम्ही विसरत नाही
* ते आमचे मित्र आहेत
* विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची सचोटी आणि कितीही दबाव आणला तरी आपण योग्य निर्णय दिला
* शिवसेना कोणाची यावर अनेक आरोप झाले
* आपण निकाल दिला त्यात अनेक आरोप केले, त्यात अनेक प्रवक्ते , विश्व प्रवक्ते होते
* कामकाजात सहभाग नाही
* आम्ही त्याकडे लक्ष दिलं नाही
* आमच काम करत राहिलो
* पहिले आम्ही दोघे होतो, नंतर अजित दादा आले त्यांनंतर आम्ही तीन शिफ्ट मध्ये काम सुरु होतं
* बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण गेले, नाना पटोले वाचले
* लोकसभेला फेक नेरिटीव्ह केल त्याचा फटका आम्हाला बसला
* त्यावेळी का मागितलं नाही बेलेट
* त्यावेळी सर्व बुलेटवर स्वार होऊन सुसाट होते
* हरलो की ईव्हीएम
* आता निरजीव ईव्हीएम वरती आरोप करता
* निकाल तुमच्या बाजूने लागला की लोकशाहीचा विजय असतो
* सुप्रीम कोर्टाचे जज ही म्हणाले की हरता तेव्हा तुम्ही बोलता
* कोणी १ लाखाने येतो तर कोणी दोनशे आठ मतांनी येतो
* मारकडवाडीत तुमचे लोक गेले
* त्यांनी आता सांगतील क बाहेरचे कोणी येऊ नका
* त्यामुळे मारकडवाडीत जाऊ नका नाही तर कार्यक्रम होईल
* केस सुरु असताना मला टेन्शन होत
- काय होईल
* मात्र आपण मेरीट वरती निकाल दिला
* काही लोक म्हणतात आता काही दिशा आहे का
* लोकांनी तुमची दशा केल्यानंतर काय दिशा असणार
* काही लोकांनी आता बहिष्कार टाकला आहे
* लोकभावनेची त्यांना दिशा कळली असती तर अशी दशा झाली नसती
* जबतक सुरज चांद रहेगा तब तक संविधान रहेगा
* बाबासाहेब आंबेडकर यांचा दोनदा पराभव काँग्रेसने केला
* बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळतं घर आहे
* लाल संविधान आणल होतं त्यात कोरी पानं होती त्यात मी जात नाही
* राहूल नार्वेकर तुम्ही सभागृहाचा कोहीनुर आहेत
* सत्ताधारी असो की विपक्ष
* विरोधक ऐकण्याची सवय ठेवा