एक्स्प्लोर

Ajit Pawar : आया बहिणींना सांगायचंय, 10 वेळा अर्थसंकल्प मांडलाय, मी शब्दाचा पक्का; अजित पवार कडाडले

Ajit Pawar, Mumbai : "मला महाराष्ट्रातील आया बहि‍णींना सांगायचंय, मी दहा वेळेस अर्थसंकल्प सादर केलाय. मी कधीही खोटं बोलत नाही."

Ajit Pawar, Mumbai : "मला महाराष्ट्रातील आया बहि‍णींना सांगायचंय, मी दहा वेळेस अर्थसंकल्प सादर केलाय. मी कधीही खोटं बोलत नाही. हा अजित पवारचा वादा आहे, असा तसा वादा नाही", असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. अजित पवार यांनी विधानसभेत लाडकी बहिण योजनेवर भाष्य केलं. यावेळी ते बोलत होते. 

योजनेमध्ये काही दुरुस्त्या करण्यास संबंधित विभागाला सांगितलं आहे

अजित पवार म्हणाले, राज्य सरकारचा योजना व्यवस्थितरित्या राबवण्यासाठी विरोधी पक्षांनी केलेल्या सूचनांचा मी आदर करतो. योजनेमध्ये काही दुरुस्त्या करण्यास संबंधित विभागाला सांगितलं आहे. हा अर्थसंकल्प सादर करताना राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, हा विचार करण्यात आलाय. प्रत्येक समाज घटकाच्या अडचणी दूर व्हाव्यात, हीच आपल्या सर्वांची इच्छा आहे. प्रत्येक समाजघटकाला न्याय देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केला आहे. राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी कोणालाही  पैसे देऊ नका, असे आवाहन केले आहे. महिलांनो कुणालाही पैसे देऊ नका. कोण तुमच्याकडे पैसे मागत असेल तर सांगा. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे ऑगस्टमध्ये हातात आले तरी तुम्हाला  1 जुलैपासूनची रक्कम मिळेल. योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी रांगा लागत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची महत्त्वाची मुदतही वाढवून दिली आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

आजवर 9 वेळेस जयंत पाटील यांनी अर्थसंकल्प मांडला होता

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, वारकरी, दुर्बल घटक, शेतकरी, विद्यार्थी या सर्वांचा विचार करुन अर्थसंकल्प सादर केला आहे. सभागृहात जयंत पाटलांचं एक रेकॉर्ड होतं. आजवर 9 वेळेस जयंत पाटील यांनी अर्थसंकल्प मांडला होता. पण मला दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली. आम्हाला थोडा का होईना अनुभव आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत होतो, तेव्हाही अर्थसंकल्प मांडायचो. दोन्हीकडूनही अर्थसंकल्प मांडला. 

लाडकी बहिण योजनेसाठी अपात्र कोण असेल?

* 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
* घरात कोणी Tax भरत असेल तर
* कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
* कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
* कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )

अर्ज भरताना लागणारी कागदपत्रे 

आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्नाचा दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , अर्जदाराचा फोटो, अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, लग्नाचे प्रमाणपत्र

योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

इतर महत्वाच्या बातम्या 

CM Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये बँक खात्यात कधी येणार? अजितदादांनी तारीख सांगितली

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget