Ajit Pawar : अजित पवारांकडून पुन्हा एकदा बारामतीतून माघार घेण्याचे स्पष्ट संकेत, कार्यकर्त्यांनाही भावनिक आवाहन
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामती विधानसभा मतदारसंघातून माघार घेण्याचे संकेत दिले आहेत.
Ajit Pawar, बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामतीतून माघार घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बारामतीमध्ये बोलत असताना अजित पवारांनी पुन्हा कार्यकर्त्यांसमोर भावनिक आवाहन केलं आहे. दरम्यान, यंदाच्या वेळेस मी जो उमेदवार देईल, असं अजित पवार यांनी म्हणताच कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
आमदार कशा पद्धतीने निवडून द्यायचा ते तुम्ही ठरवायचं
अजित पवार म्हणाले, समोरच्या गटाकडे बुथसाठी माणसं सुद्धा नव्हती पण आपल्या सगळ्यांना निमित्त झाले. याचा मी बारकाईने विचार केला आहे. आमदार कशा पद्धतीने निवडून द्यायचा ते तुम्ही ठरवायचं. एकमेकांची उनी धुनी काढून काही उपयोग नाही. तुम्ही जे लोकसभेला करायचं ते केलं मी त्याची नाराजी व्यक्त केली नाही.
पुढच्या वेळी मी महायुतीचा अर्थ संकल्प तुमच्या आशीर्वादाने सादर करेन
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, जनाई शिरसाईसाठी 430 कोटी खर्च करणार आहोत. खडकवसला ते फुरसुंगी आम्ही बंद पाईपलाईनची योजना केली आहे. त्यातून 3 टीएमसी पाणी वाचणार आहे. मी सरकारमध्ये कामे करण्यासाठी गेलो आहे. पाण्यात मी राजकारण करणार नाही. समोरची लोकं येऊन काय सांगतील तो त्यांचा अधिकार आहे. नीरा कऱ्हा स्थिरीकरण करणार त्यासाठी 39 हजार एचपीच्या पंपची गरज, त्यासाठी 1025 कोटी खर्च, साडेसात फूट व्यासाचे 17 किलोमीटर ही पाईपलाईन असेल. दोन टप्प्यात पाणी उचणार आहे. मी पेपर मागवले आहे. त्याला मी मान्यता देईल. पुढच्या वेळी मी महायुतीचा अर्थ संकल्प तुमच्या आशीर्वादाने करेन.
अजित पवारांचे भाषण सुरू असताना त्यांचे सहाय्यक फोनवरती आले आणि त्यांना एक चिठ्ठी दाखवली त्यावर त्यांनी कारवाई करा असे त्यांनी सांगितले. फोन वर काय बोलायचं थेट कारवाई करा, अजित पवारांनी भाषणादरम्यान कारवाईचे आदेश दिले. लोकसभेवेळी तुम्ही आमच्यावरती रागावला होता कांदा निर्यात बंदी केली म्हणून आता कांदा निर्यात बंदी उठवली आहे, असंही अजित पवार यांनी नमूद केलं. घोडगंगा बंद पडला तर तो तिकडे ओरडून सांगतोय अजित पवारने बंद पाडला. त्याचा खासगी कारखाना चांगला चालवतो. हा कारखाना का नीट चालत नाही. त्याला काय सांगायला नाही म्हणून माझं नाव सांगतो, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांचे आमदार अशोक पवार यांना टोला लगावला.
इतर महत्त्वाच्या बातम्या