नगरमध्ये निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदान केंद्रावर प्रचार, निलेश लंकेंचा विखेंवर गंभीर आरोप
Ahmednagar Lok Sabha Election: निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदान केंद्रावर प्रचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पाथर्डी तालुत्यातील घुमटवाडीतील केंद्राचा व्हिडीओ असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अहमदनगर : बारामतीप्रमाणे (Baramati Lok Sabha Election) अहमदनगर लोकसभा मतदार (Ahmednagar Lok Sabha Election) संघात मतदानाच्या आदल्या रात्री पैशाचा पाऊस पडत असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. नगरचे महाविकासआघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपचे उमेदवार सुजय विखेंवर गंभीर आरोप केला आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदान केंद्रावर प्रचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पाथर्डी तालुत्यातील घुमटवाडीतील केंद्राचा व्हिडीओ असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील घुमटवाड येथे भाजपा उमेदवारांनी आपल्या तालुक्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मतदान केंद्रावर आपल्यालाच मतदान कसे होईल या अनुषंगाने मतदान केंद्रावर स्वतःच्या प्रचाराचे व चिन्हाचे प्रदर्शन केले आहे. हा निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचा भंग असून असेच चालणार असेल तर प्रशासनाने देखील भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून घ्या, असे म्हणत निलेश लंकेंनी संताप व्यक्त केला आहे.
काय आहे व्हायरल व्हिडीओमध्ये?
घुमटवाडीच्या मतदान केंद्रामध्ये स्वतःच्या प्रचाराचे व चिन्हाचे प्रदर्शन केले आहे. याकडे निवडणूक आयोगाने लक्ष देण्याची मागणी केली आहे. याला काही अर्थ नाही. अधिकाऱ्याच्या संगनमताने हा प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात आली आहे. तसेच मतदारांना जबरदस्तीने मत करायला भाग पाडत आहे. हा सर्व प्रकार मतदान केंद्रावर घडल्याने मतदान केंद्र बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
असे असेल तर प्रशासनाचाही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून घ्या!
— Nilesh Lanke - निलेश लंके (@Nilesh_LankeMLA) May 13, 2024
घुमटवाडी, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर येथे भाजपा उमेदवारांनी आपल्या तालुक्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मतदान केंद्रावर आपल्यालाच मतदान कसे होईल या अनुषंगाने मतदान केंद्रावर स्वतःच्या प्रचाराचे व चिन्हाचे प्रदर्शन… pic.twitter.com/J6onEpNH2T
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार निलेश लंकेंनी देखील काही व्हिडीओ शेअर केले. त्यानंतर आता रोहित पवारांनी देखील एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. इतकेच नाही तर गावागावात पाकीट वाटले जात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. अहमदनगरममध्ये हाआघाडीचे उमेदवार नीलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील असा सामना होत आहे.सुजय विखे पाटील यांच्याकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी पाकीटाच्या फोटोसह केलेली पोस्ट देखील केली आहे.
निलेश लंकेंनी काय आरोप केले?
सध्याची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. अहमदनगरमध्ये विखे परिवाराकडून पैशांचा पाऊस पडला आहे.या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर देखील झाला. अहमदनगर लोकसभेतील जनता स्वाभिमानी आहे, ती भाजपच्या पैशांच्या मोहाला आणि दमदाटीला बळी पडणार नाही. भाजपला पराभव समोर दिसत आहे, त्यामुळे या गोष्टी घडताना दिसत आहे, असे निलेश लंके म्हणाले.
हे ही वाचा :