Anna Hazare: नगरमध्ये लंके की सुजय विखे, कोणाला मतदान द्यायचं? अण्णा हजारेंनी मतदारांना दिला मेसेज, म्हणाले...
1857- ते 1947 तब्बल 90 वर्षे बलिदान देत या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ते स्वातंत्र्य आबाधित ठेवायचे असेल तर मतदाराची जबाबदारी फार महत्त्वाची आहे, असे अण्णा हजारे म्हणाले.
![Anna Hazare: नगरमध्ये लंके की सुजय विखे, कोणाला मतदान द्यायचं? अण्णा हजारेंनी मतदारांना दिला मेसेज, म्हणाले... Ahmednagar Lok Sabha Election 2024 Anna Hazare Advise to voter While Votins Sujay Vikhe vs Nilesh Lanke Maharashtra News Anna Hazare: नगरमध्ये लंके की सुजय विखे, कोणाला मतदान द्यायचं? अण्णा हजारेंनी मतदारांना दिला मेसेज, म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/9c25d74a16a7c5a5122e7e242576b2b5171557510439189_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर: समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांना राळेगणसिद्धीमध्ये मतदानाचा अधिकार बजावला आहे. या वेळी अण्णा हजारेंनी कोणाला मतदान करावे याविषयी मतदारांना सल्ला दिला आहे. पक्ष आणि व्यक्ती न पाहता आपण मतदान करणारा उमेदवार चारित्र्यशील, विचारशील आणि निष्कलंक असला पाहिजे, असे अण्णा हजारे म्हणाले. तसेच देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल तर मतदाराची जबाबदारी फार महत्त्वाची आहे, असे अण्णा हजारे म्हणाले. ते राळेगणसिद्धीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
अण्णा हजारे म्हणाले, ज्यांना मतदान करायचे त्यांनी मागच्या काळात काय केले ते पाहणे महत्त्वाचे आहे. तो मतदारसंघासाठी किती झिजला, दिव्यासारखा किती जळला हे पाहणे गरजेचे आहे. ते पाहूनच मतदान करा. मतदाराने मतदान करताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
मतदाराने मतदान करताना खालील गोष्टी लक्षात गरजेचे आहे.
- मत देताना तो आचारशील, विचारशील, निष्कलंक जीवन, अपमन सहन करण्याची शक्ती हे गुण पाहिजे. तो दिव्यासारखा झटत राहिला पाहिजे.
- मतदाराने ज्यांना मतदान करायचे त्याचे चारित्र्य कसे आहे. त्याचे आचार- विचार कसे आहे? त्याचे जीवन निष्कलंक आहे का? दाग लागलेले आहे का? हे पाहिले पाहिजे. खरी लोकशाही आणायची असेल तर मतदारांची जबाबादारी महत्त्वाची आहे.
- मतदान केले पाहिजे. मी पक्ष पाहत नाही स्त्री किंवा पुरुष असेल तरी त्याचे चारित्र्य चांगले पाहिजे. हा देश कोणी चालवायचा त्याची चावी कोणाच्या हातात द्यायची हे ठरवायचे आपल्या हातात आहे. मतदाराच्या हाती चावी आहे. योग्य चावी लावली पाहिजे. चावी चुकीच्या हातात गेली तर देशाचे वाटोळे होईल.
स्वातंत्र्य आबाधित ठेवायचे असेल तर मतदाराची जबाबदारी फार महत्त्वाची: अण्णा हजारे
आज प्रत्येक नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहे. या देशासाठी अनेक लोकांनी प्राणाचे बलिदान दिले, तुरुंगवास भोगला, फासावर गेले. 1857- ते 1947 तब्बल 90 वर्षे बलिदान देत या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ते स्वातंत्र्य आबाधित ठेवायचे असेल तर मतदाराची जबाबदारी फार महत्त्वाची आहे. जागृत मतदार हाच लोकशाहीचा आधार आहे. मतदार जागृक होईल त्याचदिवशी देशामध्ये लोकशाही खऱ्या अर्थाने येईल, असेही अण्णा हजारे म्हणाले.
Video :
हे ही वाचा :
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)