...तर निवडणूक आयोग एलॉन मस्क यांना अटक करेल; ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा जोरदार पलटवार
Aditya Thackeray on Ravindra Waikar : निवडणूक आयोग एलॉन मस्क यांच्यावर सुद्धा कारवाई करेल. ते देशात आले तर अटक सुद्धा करू शकते, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुंबई : एलॉन मस्क (Elon Musk) भारतात आले तर, निवडणूक आयोग (Election Commission) त्यांना अटकही करु शकते, असं वक्तव्य आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले की, एलॉन मस्क यांनी स्वतः सांगितलं ईव्हीएम (EVM) हॅक होऊ शकतात. निवडणूक आयोग एलॉन मस्क यांच्यावर सुद्धा कारवाई करेल. एलॉन मस्क देशात आले तर अटक सुद्धा करू शकते, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. निवडणुकीत ईव्हीएमचा फ्रॉड झालेला आहे. आम्ही कोर्टात जाणार, आम्ही ही लढाई लढणार आणि जिंकणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
निवडणुकीत ईव्हीएमचा फ्रॉड झालाय
आदित्य ठाकरे यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावर भाष्य करताना म्हटलं आहे की, उत्तर पश्चिम मतदारसंघाबद्दल आम्ही पहिल्यापासून सांगत होतो. हा विषय लावून धरलेला आहे. या सगळ्या संदर्भात आम्ही सुद्धा कोर्टात जाणार आहोत. निवडणुकीत ईव्हीएमचा फ्रॉड झालेला आहे. या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोग समोर आलेला आहे. आम्हीही लढाई लढणार आणि जिंकणार. एलॉन मस्क यांनी स्वतः सांगितलं EVM हॅक होऊ शकतात.
ईव्हीएम नसता तर भाजपला 40 पण जागा मिळाल्या नसत्या
ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे. निवडणूक आयोग एलॉन मस्क यांच्यावर सुद्धा कारवाई करेल. एलॉन मस्क देशात आले तर अटक सुद्धा करू शकते. निवडणूक आयोग हे भाजपच्या कार्यालयातून चालतं. 303 नंतर हुकूमशाहाला आम्ही 240 वर आणला आहे. ईव्हीएम नसता तर भाजपला 40 जागा पण मिळाल्या नसत्या, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
कोण रडतंय ते आम्हाला माहितंय
दरम्यान, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात रवींद्र वायकर यांच्या अवघ्या 48 मतांनी विजय झाला. या मतदारसंघातील ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडे सापडल्याने महाविकास आघाडीकडून महायुतीवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया हा रडीचा डाव बंद करा, असं रवींद्र वायकर म्हणाले. वायकरांच्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांनी आता पलटवार केला आहे. रवींद्र वायकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना आदित्य ठाकरे म्हणाले की, रडत कोण आहे, हे आम्हाला स्वतः माहित आहे.
10 टक्के पाणीकपात सांगत पालिकेकडून 50 टक्के पाणी कपात
याशिवाय, माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील पाणीकपातीच्या मुद्द्यालाही हात घातला. मुंबईतील पाणीकपाती बद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आज बीडीडी चाळीतील काम निवडणुकीचं कारण देऊन PWD कडून केली जात नव्हती, ती सुरू करण्यात आली आहेत. 10 टक्के पाणीकपात असं पालिका म्हणत आहे. मात्र 50 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :