एक्स्प्लोर

Aditya Thackeray : 'राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात निवडणूक लढवा', आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना खुलं आव्हान

Shiv Sena Thackeray Group : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान देतं म्हटलं की, 'एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, आणि माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, हा कोणाचा बालेकिल्ला नाही.'

Aditya Thackeray Challenge to CM Eknath Shinde : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाचं आव्हान दिला आहे. रविवारी आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात सभांचा धडाका लावला आणि ठाण्यात 'इलाका हमारा और धमाका भी हमारा होगा' असं म्हणत एकनाथ शिंदेंना ठाण्यात (Thane) आपल्या विरोधात उभे राहण्याचं आव्हान दिलं आहे.

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंना खुलं आव्हान

एकनाथ शिंदे यांचा पालिकेचा समजला जाणारा ठाणे जिल्हा आणि याच ठाणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गट आपली संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विशेष लक्ष केंद्रित करत आहे. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला नाही, तर 'हा इलाका भी हमारा आणि धमाका भी हमारा', असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी रविवारी ठाण्यामध्ये सभांचा धडाका लावला. आनंद नगर, मनोरमा नगर, चंदनवाडी, जिजामाता नगर या चार शाखांच्या ठिकाणी आदित्य ठाकरेंनी सभा घेतल्या. 

'राजीनामा द्या आणि माझ्या विरोधात निवडणूक लढा'

आदित्य ठाकरेंनी संपूर्ण ठाणे शहरात एक प्रकारे पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन केलं. या सभांमध्ये थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच आदित्य ठाकरे यांनी आपल्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा आव्हान दिलं. भाषणात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान देतं म्हटलं की, 'एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, आणि माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, हा कोणाचा बालेकिल्ला नाही.'

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरे हे आव्हान देऊनच थांबले नाहीत तर एकनाथ शिंदे ही घटनाबाह्य अपयशी मुख्यमंत्री आणि शिवसैनिक म्हणून अपयशी ठरल्याचा उल्लेख त्यांनी केला. 20 मे 2022 ला एकनाथ शिंदे हे वर्षावर येऊन उद्धव ठाकरे समोर  रडले आणि भाजप मला जेलमध्ये टाकेल असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर एका महिन्यातच त्यांनी गद्दारी केली असं आदित्य ठाकरेंनी भाषणात सांगितलं. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात ठाण्यात शड्डू ठोकल्यानंतर आणि आव्हान दिल्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांकडून सुद्धा आदित्य ठाकरे यांच्या या प्रतिक्रिया विरोधात भाष्य करायला सुरुवात केली आहे. 

आदित्य ठाकरेंचं शिंदेंच्या ठाण्यात शक्तीप्रदर्शन

याआधी सुद्धा अशाच प्रकारची आव्हान आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना दिले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट  ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष ठेवून आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या ठाण्यात पक्षाचे बळ वाढावं यासाठी मेळावे सभा दौरे ठाकरे गटाकडून आयोजित केले जात आहेत. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपल्या शाखा भेटींचा कार्यक्रम कल्याण लोकसभा मतदारसंघातून काही दिवसांपूर्वी सुरू केला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी कल्याणमध्ये जाऊन सभा घेतली आणि आता ठाण्यामध्ये शाखा भेटी सुरू केल्या. त्यामुळे पक्षाकडून पूर्ण ताकद या ठाणे जिल्ह्यात लावताना पाहायला मिळतंय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आव्हान स्वीकारणार?

सध्या ठाण्याची राजकीय परिस्थिती बघितली तर, विद्यमान खासदार शिवसेना ठाकरे गटाचा असला तरी ठाणे महापालिकेतील शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक, पदाधिकारी हे एकनाथ शिंदेंसोबत आहेत. मात्र, नेते जरी त्यांच्यासोबत असले तरी ठाण्यातील मतदार हा आपल्या बाजूने असल्याचा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलाय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे. त्यामुळे ठाणे असेल की, मग कल्याण लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर कुण-कुणाचं आव्हान स्वीकारतं हे स्पष्ट होईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
Prakash Abitkar & Hasan Mushrif : प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
Maharashtra Cabinet expansion : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
Nagpur Oath Ceremony: महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharatshet Gogawale Oath : 'मी भरतशेठ गोगावले...' म्हणत घेतली मंत्रिपदाची शपथMaharashtra Cabinet Expansion :फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी, कुणा-कुणाला मंत्रिपदाची शपथ?Bhalchandra Nemade Majha Katta| इंग्रजीला धुतलं, राजकारण्यांना झोडपलं,भालचंद्र नेमाडे 'माझा कट्टा'वरSunil Tatkare : संघटनेच्या मजबुतीला प्राधान्य देण्याचं काम पुढील काळात होईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 
Prakash Abitkar & Hasan Mushrif : प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री, 'माझा'च्या बातमीवर शिक्कामोर्तब; महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ एकमेव मुस्लीम चेहरा, दादांकडूनही मानाचे पान!
Maharashtra Cabinet expansion : महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात किती लाडक्या बहिणी? कोणत्या पक्षाच्या किती महिलांनी घेतली शपथ?
Nagpur Oath Ceremony: महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी
Prakash Abitkar : कामगाराचा मुलगा, पंचायत समिती सदस्य, उत्कृष्ठ संसदपटू, राधानगरीत आमदारकीची हॅट्ट्रिक ते कॅबिनेट मंत्री! प्रकाश आबिटकरांचा झंझावाती राजकीय प्रवास
कामगाराचा मुलगा, पंचायत समिती सदस्य, उत्कृष्ठ संसदपटू, राधानगरीत आमदारकीची हॅट्ट्रिक ते कॅबिनेट मंत्री! प्रकाश आबिटकरांचा झंझावाती राजकीय प्रवास
Mahayuti Goverment Minister List : महायुती सरकारमध्ये भाजपत चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीत हसन मुश्रीफ अन् शिवसेनेत गुलाबराव पाटील दुसऱ्या क्रमांकाचे नेते
महायुती सरकारमध्ये भाजपत चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीत हसन मुश्रीफ अन् शिवसेनेत गुलाबराव पाटील दुसऱ्या क्रमांकाचे नेते!
लंडनला शिकले, काँग्रेसमधून पहिल्यांदा आमदार झाले, भाजपचा हिंदूत्ववादी चेहरा, मंत्री नितेश राणेंचा जीवनप्रवास
लंडनला शिकले, काँग्रेसमधून पहिल्यांदा आमदार झाले, भाजपचा हिंदूत्ववादी चेहरा, मंत्री नितेश राणेंचा जीवनप्रवास
Pankaja Munde Profile: वडिलांच्या निधनानंतर जबाबदारी, दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी; पंकजा मुंडेंचं बालपण, शिक्षण अन् नागमोडी राजकीय प्रवास
वडिलांच्या निधनानंतर जबाबदारी, दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी; पंकजा मुंडेंचं बालपण, शिक्षण अन् नागमोडी राजकीय प्रवास
Embed widget