मोठी बातमी: अभिनेत्री स्वरा भास्कर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, पुनम महाजनांच्या मतदारसंघातून रिंगणात उतरणार?
Swara Bhasker, Mumbai North-Central : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून अभिनेता गोविंदा (Govinda) याला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
![मोठी बातमी: अभिनेत्री स्वरा भास्कर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, पुनम महाजनांच्या मतदारसंघातून रिंगणात उतरणार? Actress Swara Bhaskar Possibility to join Congress Party Swara Contest Loksabha elction against Govinda Maharashtra Politics Marathi News मोठी बातमी: अभिनेत्री स्वरा भास्कर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, पुनम महाजनांच्या मतदारसंघातून रिंगणात उतरणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/22/6510d0efe648d5c16b6d6df59faa35b01711105880123924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Swara Bhasker, Mumbai North-Central : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून अभिनेता गोविंदा (Govinda) याला उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना काँग्रसने नवा डाव खेळला आहे. गोविंदाचे नाव लोकसभा उमेदवारीसाठी चर्चेत आल्यानंतर आता काँग्रेसनेही या मतदारसंघात बॉलिवूड अभिनेत्रीला मैदानात उतरवण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) गोविंदा विरोधात मैदानात उतरवू शकते. स्वरा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी स्वरा भास्कर हिला उमेदवारीबाबत विचार करु, असे आश्वासन दिले आहे.
शिंदे गट उत्तर मध्य मुंबई मतदारसंघासाठी आग्रही
उत्तर मध्य मुंबई या मतदारसंघात सध्या भाजपच्या खासदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातून पुन्हा एकदा पूनम महाजन निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, शिंदे गट या जागेसाठी आग्रही आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिंगे गट अभिनेता गोविंदाला मैदानात उतरवणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन विरुद्ध स्वरा भास्कर किंवा गोविंदा विरुद्ध स्वरा भास्कर अशी लढत होणार असल्याची चर्चा आहे.
स्वरा भास्करची भाजपविरोधात भूमिका
अभिनेत्री स्वरा भास्कर अनेकदा भाजपविरोधात आंदोलन करताना दिसली आहे. 2019 मध्ये सीएए आणि एनआरसीच्या कायद्यांविरोधात ती मैदानात उतरली होती. शिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेतही ती सामील झाली होती. त्यामुळे स्वरा भास्कर आजवर अनेकदा भाजप विरोधात मैदानात उतरताना दिसली आहे. शिवाय डाव्या पक्षासोबत तिचे एकमत झाल्याचेही अनेकदा पाहायला मिळाले आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)